NZ vs IND, 2nd ODI : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली अंपायरवर भडकला, पण का?

भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील पहिला सामना यजमानांनी जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2020 12:32 PM2020-02-08T12:32:52+5:302020-02-08T12:33:43+5:30

whatsapp join usJoin us
New Zealand vs India, 2nd ODI : Virat Kohli loses his cool at umpire Bruce Oxenford   | NZ vs IND, 2nd ODI : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली अंपायरवर भडकला, पण का?

NZ vs IND, 2nd ODI : टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली अंपायरवर भडकला, पण का?

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेतील पहिला सामना यजमानांनी जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे. त्यामुळे मालिकेतील आव्हान वाचवण्यासाठी आजचा सामना हा टीम इंडियासाठी करो वा मरो असाच आहे. त्यात भारतीय गोलंदाज व क्षेत्ररक्षकांनी उल्लेखनीय कामगिरी करताना किवींच्या डावाला सुरूंग लावला होता. पण, रॉस टेलरनं न्यूझीलंडला सामन्यात कमबॅक करून दिलं. त्याच्या नाबाद खेळीच्या जोरावर किवींनी 273 धावांपर्यंत मजल मारली. पण, या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली अंपायरवर भडकलेला पाहायला मिळाला. त्याला चाहत्यांचाही पाठींबा मिळाला.

नाणेफेक जिंकून विराटनं प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. मार्टीन गुप्तील ( 79) आणि हेन्री निकोल्स ( 49) यांनी पहिल्या विकेटसाठी 93 धावांची भागीदारी केली. 17 व्या षटकात युजवेंद्र चहलनं टीम इंडियाला पहिली विकेट मिळवून दिली. 17व्या षटकात चहलच्या गोलंदाजीवर निकोल्स पायचीत झाला. चहलच्या चेंडूवर स्वीप मारण्यात तो अपयशी ठरला. अंपायरनेही त्याला बाद दिले. पण, त्यानंतर ड्रामा घडला. DRS मागण्यासाठी निकोल्स आणि गुप्तील यांच्यात चर्चा सुरू झाली. त्यासाठीची 15 सेकंद उलटल्यानंतर निकोल्सनं तिसऱ्या पंचाकडे दाद मागितली आणि मैदानावरील अंपायरने ती मान्यही केली. त्यावर कोहली भडकला. तिसर्या पंचांनीही निकोल्सला बाद दिले. पण, कोहलीच्या या भडकण्याचे चाहत्यांनीही समर्थन केले. 

गुप्तील बाद झाला अन् सामना फिरला, पण...
गुप्तीलनंतर किवी फलंदाजांनी तंबूत परतण्याचा सपाटा लावला. टॉम लॅथम आणि जिनी निशॅम हे लगेच माघारी परतले. त्यामुळे टीम इंडियानं सामन्यात पुनरागमन केले. जडेजानं क्षेत्ररक्षणात पुन्हा एकदा चपळता दाखवताना निशॅमला धावबाद केले. शार्दूलनं किवींना आखणी एक धक्का दिला. कॉलीन डी ग्रँडहोम स्वस्तात बाद झाला. मार्क चॅपमॅन (1)चा युजवेंद्र चहलनं स्वतःच्याच गोलंदाजीवर सुरेख झेल घेतला. चहलचा हा झेल पाहून कर्णधार कोहलीनंही आश्चर्य व्यक्त केलं. 1 बाद 142 वरून न्यूझीलंडची अवस्था 7 बाद 187 अशी दयनीय केली. 


पण, रॉसनं जबरदस्त पलटवार करताना अर्धशतक पूर्ण केलं. त्यानं शार्दूरनं टाकलेल्या 47 षटकात 17 धावा चोपल्या. त्याच्या फटकेबाजीच्या जोरावर किवींनी 8 बाद 273 धावांचा समाधानकारक पल्ला गाठला. रॉसनं नवव्या विकेटसाठी कायले जॅमिसनला सोबत घेत अर्धशतकी भागीदारी केली. जॅमिसन 24 चेंडूंत 25 धावांवर ( 1 चौकार व 2 षटकार) नाबाद राहिला. रॉसनं 74 चेंडूंत 6 चौकार व 2 षटकार खेचून नाबाद 73 धावा केल्या 

Web Title: New Zealand vs India, 2nd ODI : Virat Kohli loses his cool at umpire Bruce Oxenford  

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.