कोरोना व्हायरसमुळे क्रिकेट स्पर्धा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यात इंडियन प्रीमिअर लीग आणि ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवरही अनिश्चिततेचं सावट आहे. दोन-अडीच महिन्यांनी क्रिकेटला सुरुवात होणार आहे. इंग्लंड-वेस्ट इंडिज कसोटी मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे पुनरागमन होत आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे. आता दक्षिण आफ्रिकेतही क्रिकेटला सुरुवात होणार आहे. पण, हा क्रिकेट सामना थोडा वेगळा असेल, इथे तीन संघांमध्ये एक सामना होणार आहे. या सामन्यात एबी डिव्हिलियर्स यांच्यासह आफ्रिकेचे दिग्गज खेळाडू सहभागी होणार आहेत. सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क मैदानावर 27 जूनला हा सामना होणार आहे.
किंग फिशर्स, क्विंटी काईट्स आणि एबी ईगल्स असे या संघांची नावं असून कागिसो रबाडा, क्विंटन डी कॉक आणि एबी डिव्हिलियर्स हे या संघांचे नेतृत्व करणार आहेत. क्रिकेट दक्षिण आफ्रिकेनं बुधवारी ही घोषणा केली. Solidarity Cup असे या मॅचला नाव देण्यात आले आहे. प्रत्येक संघात 8 खेळाडूंचा समावेश असेल आणि 36 षटकांच्या सामन्यात प्रत्येक संघाला 12 षटकं खेळण्याची संधी दिली जाणार आहे.
एक संघ उर्वरित दोन संघांविरुद्ध 6-6 षटकांच्या ब्रेकसह 12 षटके फलंदाजी करेल. संघातील सातवा गडी बाद झाल्यावर नाबाद फलंदाज फलंदाजी करू शकेल. पण, त्याची एकेरी धाव ग्राह्य धरली जाणार नाही. त्यामुळे त्याला केवळ दुहेरी धाव घ्यावी लागेल. प्रत्येक गोलंदाज जास्तीत जास्त तीन षटके टाकू शकतो. 12 षटकांत सर्वाधिक धावा करणारा संघ विजेता घोषित केला जाईल. विजेत्या खेळाडूला सुवर्णपदक, उपविजेत्या संघाला रौप्यपदक तर तिसऱ्या क्रमांकावरील संघाला कांस्यपदक दिले जाईल. सामना टाय झाल्यास सुपर ओव्हरमध्ये निकाल लावला जाईल.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
विराट कोहली, रोहित शर्मासह क्रीडा विश्वानं शहीद जवानांना वाहिली श्रद्धांजली
54 लाख लोकांनी पाहिलंय 'या' पठ्ठ्याचं सेलिब्रेशन; असं आहे तरी काय Viral Videoत?
बाबो; अर्जेंटिनाच्या फुटबॉलपटूचे 'एलियन'नं केलेलं अपहरण; खेळाडूचा धक्कादायक दावा
CSKच्या डॉक्टरचं वादग्रस्त ट्विट; फ्रँचायझीकडून त्वरित निलंबनाची कारवाई
Video : चोरट्यांच्या मनाला पाझर फुटला; डिलिव्हरी बॉयला लुटायला गेले, पण...