Join us  

बाप होऊन 10 दिवस झाले, आता कसल्या शुभेच्छा देतोस; रोहित शर्माचा 'या' खेळाडूला टोमणा

रोहित शर्माने 2019च्या पहिल्याच वन डे सामन्यात खणखणीत शतक झळकावले, परंतु त्याला भारताला विजय मिळवून देता आला नाही.

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2019 12:18 PM

Open in App
ठळक मुद्देरोहित शर्माचे 2019मधील पहिल्याच सामन्यात खणखणीत शतकऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची केले कौतुक

सिडनी, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया : रोहित शर्माने 2019च्या पहिल्याच वन डे सामन्यात खणखणीत शतक झळकावले, परंतु त्याला भारताला विजय मिळवून देता आला नाही. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी ठेवलेल्या 289 धावांचा पाठलाग करताना भारताला 254 धावांपर्यंतच मजल मारता आली. ऑस्ट्रेलियाने 34 धावांनी हा सामना जिंकून मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. कन्यारत्न प्राप्ती झाल्यानंतर रोहितचा हा पहिलाच आंतरराष्ट्रीय सामना होता आणि त्यामुळे मुलीच्या पायगुणामुळेच रोहितने ही शानदार खेळी केली, अशी चर्चा रंगू लागली आहे. सामन्यानंतर संघातील एका सदस्याने बाप झाल्याच्या शुभेच्छा दिल्या आणि हिटमॅनने त्याला मस्करीत चांगलाच टोमणा मारला.

भारताचे तीन फलंदाज अवघ्या 4 धावांवर माघारी परतल्यानंतर रोहित आणि माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी यांनी शतकी भागीदारी करून संघाचा संघर्ष कायम राखला होता. मात्र, दोघं बाद झाले आणि भारताला 50 षटकांत 9 बाद 254 धावाच करता आल्या. ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करताना 5 बाद 288 धावा केल्या होत्या. सामन्यानंतर रोहित म्हणाला,''ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांची त्यांची जबाबदारी चोख बजावली. त्यांनी पहिल्या दहा षटकातच भारताचे आघाडीचे तीन फलंदाज माघारी पाठवले. कोणत्याही संघाचे प्रमुख फलंदाज बाद झाल्यावर त्यांना कमबॅक करणं किती अवघड आहे, हे सांगायची गरज नाही. त्यामुळे सुरुवातीला मी आणि धोनीनं खेळपट्टीवर टिकण्यावर भर दिला. त्यानंतर आम्ही पुढील रणनिती आखली होती. पण, दुर्दैवाने आम्ही अपयशी ठरलो.''सामना संपल्यानंतर रोहितची ही खास मुलाखात फिरकीपटू युजवेंद्र चहलने घेतली. बीसीसीआयने ती ट्विट केली आहे. त्यामध्ये रोहितने या सामन्यातून बोध घेत पुढील सामन्यात चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न असेल, असे सांगितले. या मुलाखतीनंतर चहलने त्याला बाबा झाल्याच्या शुभेच्छा दिल्या आणि रोहितने त्याला टोमणा हाणला. बाप होऊन दहा दिवस झाले आणि आता काय शुभेच्छा देतोस, असे रोहितने त्याला विचारले. 

पाहा पूर्ण व्हिडीओ...

http://www.bcci.tv/videos/id/7242/chahal-tvs-special-guest-rohit-sharma

टॅग्स :रोहित शर्मायुजवेंद्र चहलबीसीसीआयभारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया