आयपीएल २०२३ मध्ये 'Impact Player' खेळणार; ११ ऐवजी १२ खेळाडूंचा संघ निवडावा लागला, पण...

Impact Player rule in IPL 2023 likely to apply – इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये पुन्हा एकदा संघांमध्ये बदल पाहायला मिळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2022 01:01 PM2022-12-09T13:01:03+5:302022-12-09T13:01:20+5:30

whatsapp join usJoin us
10 IPL franchises will be allowed to make a use of an Impact Player during the Indian Premier League matches, but likely to apply only for Indian cricketers  | आयपीएल २०२३ मध्ये 'Impact Player' खेळणार; ११ ऐवजी १२ खेळाडूंचा संघ निवडावा लागला, पण...

आयपीएल २०२३ मध्ये 'Impact Player' खेळणार; ११ ऐवजी १२ खेळाडूंचा संघ निवडावा लागला, पण...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Impact Player rule in IPL 2023 likely to apply – इंडियन प्रीमिअर लीग २०२३ मध्ये पुन्हा एकदा संघांमध्ये बदल पाहायला मिळणार आहे. त्यासाठी २३ डिसेंबरला मिनी ऑक्शन होणार आहे आणि दिग्गज खेळाडू लिलावाच्या यादीत आहेत. पण, त्याचवेळी आयपीएल २०२३ नव्या नियमामुळे चर्चेत आली आहे.  सय्यद मोदी अली ट्वेंटी-२० स्पर्धेत प्रयोग केल्यानंतर Impact Player हा नियम आयपीएल २०२३तही लागू होणार आहे. पण, त्यात आता एक ट्विस्ट आला आहे. 

आयपीएल २०२३मध्ये सामना सुरू होण्यापूर्वी प्रत्येक फ्रँचायझीला त्यांच्या ११ नव्हे तर १२ खेळाडूंची यादी जाहीर करावी लागेल. बारावा खेळाडू हा इम्पॅक्ट खेळाडू म्हणून मैदानावर उतरणारा असेल. पहिल्या डावाच्या १४व्या षटकापर्यंत संघांना त्यांच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करून या इम्पॅक्ट खेळाडूला मैदानावर उतरवता येईल. त्यानंतर तो फलंदाजी किंवा गोलंदाजी करू शकतो. पण, ज्या खेळाडूला बाहेर केलं जाईल, तो संपूर्ण मॅचमध्ये सहभाग घेऊ शकत नाही. पावसामुळे सामना १० षटकांपेक्षा कमी झालास, तर संघांना इम्पॅक्ट खेळाडू उतरवता येणार नाही. 

नवा ट्विस्ट...
Cricbuzz ने दिलेल्या वृत्तानुसार हा इम्पॅक्ट खेळाडू म्हणून फक्त भारतीय खेळाडूच उतरू शकतात. आयपीएलने या नियमाची काही दिवसांपूर्वीच घोषणा केली होती, परंतु त्यावेळी इम्पॅक्ट खेळाडू म्हणून कोणाला बदलू शकतात हे स्पष्ट नव्हते. आता हाती आलेल्या वृत्तानुसार फ्रँचायझींना केवळ भारतीय खेळाडूच इम्पॅक्ट खेळाडू म्हणून उतरवू शकतो.  
 

मिनी लिलावात ९९१ खेळाडू; ७१४ भारतीयांचा समावेश; १४ देशांचे खेळाडू
 

आयपीएल २०२३ चे बिगुल वाजले आहे. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी  २३  डिसेंबरला कोचीमध्ये मिनी लिलाव पार पडणार आहे. लिलावासाठी ९९१ खेळाडूंनी नोंदणी केली असून त्यात ७१४ भारतीय खेळाडूंचा समावेश आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याला दुजोरा दिला आहे. १४ देशांतील खेळाडूंनी नोंदणी केली आहे. खेळाडूंच्या यादीत १८५ कॅप्ड, ७८६ अनकॅप्ड आणि २० असोसिएट खेळाडूंचा समावेश आहे. २७७ परदेशी खेळाडूंच्या यादीत ऑस्ट्रेलियाचे सर्वाधिक ५७ क्रिकेटपटू आहेत. यानंतर दक्षिण आफ्रिकेच्या ५२ खेळाडूंचा समावेश आहे. मार्च २०२३ अखेरपासून यंदाचे आयपीएल सत्र सुरू होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: 10 IPL franchises will be allowed to make a use of an Impact Player during the Indian Premier League matches, but likely to apply only for Indian cricketers 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.