भारत आणि पाकिस्तान या दोन शेजारील राष्ट्रांमधील संबंध जगजाहीर आहेत. पाकिस्तानातून सातत्यानं होत असलेल्या दहशतवादी कृत्यामुळे भारतानं त्यांच्याशी सर्व संबंधच तोडले आहेत. त्यामुळे उभय देशांमध्ये क्रिकेटच्या द्विदेशीय मालिकाही होत नाहीत. पण, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या अर्थात आयसीसीच्या स्पर्धांमध्ये उभय देशांना एकमेकांविरुद्ध खेळताना पाहणे म्हणजे दोन्ही देशांतील क्रिकेट चाहत्यांना पर्वणीच.... पण, हीच पर्वणी दुबईच्या शारजाह येथील ऐतिहासिक स्टेडियमवर पाहायला मिळाली. बुधवारी झालेल्या सामन्यात भारतीय संघानं कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला लोळवले.
भारत-पाक आणि शारजाह हे नातं फार जुनं आहे आणि याठिकाणी अनेक अविस्मरणीय सामने पाहायला मिळाले आहेत. आता ती संधी पुन्हा उपलब्ध झाली. भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये बुधवारी टेनिस क्रिकेटचा सामना रंगला. हा सामना १० षटकांचा होता. १० पीएल वर्ल्ड कप टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेच्या निमित्तानं भारत एकादश आणि पाकिस्तान एकादश संघ 11 मार्चला शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये भिडला. ८ ते १३ मार्च या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. वेस्ट इंडिजचा दिग्गज फलंदाज ड्वेन ब्राव्हो हा या स्पर्धेचा सदिच्छादूत आहे आणि अंतिम सामन्याला तो हजेरी लावणार आहे. भारतीय संघानं या सामन्यात पाकिस्तानवर ४५ धावांनी विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना टीम इंडियानं ५ बाद ८६ धावा केल्या. थोमल डायस ( २५), सुमीत ढेकळे ( १८*), उस्मान पटेल ( १८) आणि कृष्णा सातपुते ( १२) यांनी दमदार खेळी केली. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा संपूर्ण संघ ८.५ षटकांत ४१ धावांत तंबूत परतला. विश्वजीत ठाकूर ( ३/३) आणि अंकुर सिंग ( ३/७) यांनी प्रत्येकी तीन विकेट्स घेतल्या. विजय पावळे आणि सरोज यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
पाहा सामना
अन्य महत्त्वाच्या बातम्या
IPL 2020चं भवितव्य अधांतरी; शनिवारी बोलावली तातडीची बैठक
Coronavirus: केंद्र सरकारच्या 'त्या' एका निर्णयाने IPL 2020 मोठा फटका
मोठा निर्णय, सचिन-वीरूची फलंदाजी प्रत्यक्ष पाहता येणार नाही!