IPL 2025 या स्पर्धेचा नवा हंगाम २२ मार्चपासून सुरू झाला. हा हंगाम आतापर्यंतच्या सर्वात रोमांचक हंगामांपैकी एक आहे, याचा अनुभव साऱ्यांना हळूहळू येतोच आहे. यंदाच्या हंगामात अनुभवी स्टार्स आणि उदयोन्मुख युवा प्रतिभेचे उत्तम मिश्रण आहे. ही स्पर्धा जसजशी पुढे जात आहे, तसतसे या हंगामात कोणते खेळाडू सर्वाधिक प्रभावशाली ठरणार हे पाहण्यासाठी चाहते उत्सुक आहेत. स्पर्धेत विराट कोहली आणि एमएस धोनीसारखे अनुभवीही आहेत तर १३ वर्षीय वैभव सूर्यवंशीसारखे युवाही आहेत. IPL 2025 मध्ये कोणत्या १० खेळाडूंवर चाहत्यांची विशेष नजर असेल हे जाणून घेण्यासाठी आणि ताज्या अपडेट्ससाठी Zuplay.com वर लॉग इन करा.
१. विराट कोहली (रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू)
विराट कोहली आयपीएलमधील सर्वात प्रभावशाली खेळाडूंपैकी एक आहे. आरसीबीचा माजी कर्णधार अलिकडच्या आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये उत्कृष्ट फॉर्ममध्ये आहे आणि पुन्हा पुढाकार घेत संघाला चांगली दिशा देत आहे. नवा सीझन सुरु होण्याआधी त्याने २५२ आयपीएल सामने खेळले आहेत. अनुभव आणि अतुलनीय सातत्य यांच्या समृद्धतेसह कोहलीची कामगिरी २०२५ मध्ये आरसीबीच्या संघासाठी महत्त्वाची ठरेल.
२. जोस बटलर (गुजरात टायटन्स)
इंग्लंडचा स्फोटक फलंदाज आणि यष्टीरक्षक जोस बटलर या हंगामात गुजरात टायटन्समध्ये सामील झाला आहे आणि तो त्याच्या आक्रमक फलंदाजीच्या शैलीने वर्चस्व गाजवण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो आहे. आयपीएल २०२४ मध्ये, जोस बटलरने राजस्थान रॉयल्ससाठी ११ सामने खेळले. त्याने ३९.८९ च्या सरासरीने आणि १४०.७८ च्या स्ट्राईक रेटने ३५९ धावा केल्या, ज्यामध्ये दोन शतके समाविष्ट होती. तो संघाच्या दमदार कामगिरीमध्ये आघाडीवर होता. एकहाती सामना फिरवण्याची क्षमता असलेल्या बटलरची टॉप ऑर्डरमधील उपस्थिती गुजरातसाठी महत्त्वाची ठरेल.
३. श्रेयस अय्यर (पंजाब किंग्ज)
श्रेयस अय्यर हा आयपीएलमधील मधल्या फळीतील सर्वात विश्वासार्ह फलंदाजांपैकी एक आहे. या हंगामात तो पंजाब किंग्जमध्ये सामील झाला आहे. अय्यरचा अनुभव आणि नेतृत्व करण्याची क्षमता त्याच्या संघासाठी मोठी जमेची बाजू आहे. जर त्याला लवकर लय मिळाली तर तो या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंपैकी एक होऊ शकतो. अलिकडच्या मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो आयपीएल २०२५ मध्ये तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करू शकतो.
४. ऋषभ पंत (लखनौ सुपरजायंट्स)
दुखापतीनंतर रिषभ पंतचे आयपीएलमध्ये पुनरागमन हा स्पर्धेतील सर्वात अपेक्षित क्षणांपैकी एक आहे. आता लखनौ सुपरजायंट्सकडून खेळताना, पंतची आक्रमक फलंदाजी आणि नेतृत्व कौशल्य त्याच्या संघाच्या यशासाठी आवश्यक असतील. तो पुन्हा एकदा आपले कौशल्य सिद्ध करण्यास उत्सुक आहे.
५. रॉबिन मिन्झ (मुंबई इंडियन्स)
रॉबिन मिन्झ हा IPL 2025 मध्ये पदार्पण करणारा एक रोमांचक प्रतिभावान युवा खेळाडू आहे. मुंबई इंडियन्सकडून खेळताना, मिन्झला स्थानिक क्रिकेटमध्ये त्याच्या कामगिरीबद्दल उच्च दर्जा देण्यात आला आहे. निर्भिड क्रिकेट खेळण्याची त्याची क्षमता त्याला मुंबईच्या संघात एक आशादायक खेळाडू म्हणून स्थान मिळवून देऊ शकेल.
६. वैभव सूर्यवंशी (राजस्थान रॉयल्स)
फक्त १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी आयपीएलमध्ये खेळणारा सर्वात तरुण खेळाडू म्हणून इतिहास रचत आहे. राजस्थान रॉयल्सने या अद्भुत प्रतिभेवर विश्वास ठेवला आहे आणि तो जगातील सर्वोत्तम क्रिकेटपटूंविरुद्ध कसा खेळतो हे पाहण्यासाठी क्रिकेट चाहते उत्सुक आहेत.
७. रायन रिकल्टन (मुंबई इंडियन्स)
दक्षिण आफ्रिकेचा यष्टीरक्षक-फलंदाज रायन रिकल्टन हा IPL 2025 मध्ये चाहत्यांची नजर असलेला आणखी एक खेळाडू आहे. त्याची स्फोटक फलंदाजी व चपळ यष्टीरक्षण कौशल्य मुंबई इंडियन्ससाठी फायद्याचे ठरेल. जर त्याने भारतीय परिस्थितीशी चांगले जुळवून घेतले तर तो स्पर्धेतील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांपैकी एक बनू शकतो.
८. रिंकू सिंग (कोलकाता नाईट रायडर्स)
रिंकू सिंगने कोलकाता नाईट रायडर्ससाठी एक विश्वासार्ह फिनिशर म्हणून आधीच आपली योग्यता सिद्ध केली आहे. आयपीएल २०२३ मध्ये त्याच्या धाडसी कामगिरीनंतर, तो दबावाखाली जलद धावा काढण्याच्या त्याच्या क्षमतेने प्रभावित करत राहिला आहे. या हंगामात तो केकेआरसाठी आणखी मोठी भूमिका बजावेल अशी अपेक्षा आहे.
९. वरुण चक्रवर्ती (कोलकाता नाईट रायडर्स)
वरुण चक्रवर्ती त्याच्या गूढ पद्धतीच्या फिरकी गोलंदाजीमिळे केकेआरसाठी एक महत्त्वाचा खेळाडू आहे. अलिकडच्या काळात तो आयपीएलमधील सर्वोत्तम फिरकीपटूंपैकी एक आहे, अनेकदा सर्वोत्तम फलंदाजांचेही बळी घेताना दिसतो. स्पर्धेच्या शेवटच्या टप्प्यात फिरकीला अनुकूल खेळपट्ट्या असल्याने, तो केकेआरसाठी गेमचेंजर ठरू शकतो.
१०. सूर्यकुमार यादव (मुंबई इंडियन्स)
SKY म्हणून प्रसिद्ध असलेला सूर्यकुमार यादव हा जगातील सर्वोत्तम टी२० फलंदाजांपैकी एक मानला जातो. त्यांने पहिल्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सचा कर्णधार म्हणून अतिरिक्त जबाबदारी स्वीकारली आहे. त्याच्या नाविन्यपूर्ण स्ट्रोक प्ले आणि नेतृत्वगुणांमुळे तो या हंगामात मुंबईच्या जेतेपदाच्या महत्त्वाकांक्षेसाठी एक प्रमुख खेळाडू ठरतो.
IPL 2025 हा अनुभवी खेळाडू आणि तरुण प्रतिभांच्या विलक्षण मिश्रणासह एक अॅक्शन-पॅक्ड सीझन आहे. सामन्यांचे विश्लेषण करणे, अंदाज वर्तवणे आणि फॅन्टसी क्रिकेटमध्ये सहभागी होणे या बाबींमध्ये रूची असणाऱ्यांसाठी Zuplay.com हे तुमचे आयपीएल अनुभव समृद्ध करणारे एक उत्तम व्यासपीठ आहे. क्रिकेट अँक्शनमध्ये जाणकारांची मते, लाइव्ह अपडेट्स आणि इंटरॅक्टिव्ह स्पर्धांसह तुम्ही कायम खेळात आघाडीवर राहा.
Web Title: 10 Players to Watch Out for in IPL 2025
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.