Join us  

107 वर्षांची महिला क्रिकेटपटू ठरतेय योगा मास्टर; काय आहे जगण्याचे रहस्य ते जाणून घ्या...

अॅश या इंग्लंडच्या माजी महिला क्रिकेटपटू आज 107 वर्षांच्या झाल्या आहेत. पण वय 107 असूनही त्या पूर्णपणे फिट आहेत. या साऱ्या गोष्टीचे श्रेय त्यांनी योगाला दिले आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 30, 2018 5:50 PM

Open in App
ठळक मुद्देअॅश यांनी 1937 साली इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते.

नवी दिल्ली : या धकाधकीच्या जीवनात आपण किती वर्ष जगू शकतो, हे ठामपणे कुणीही सांगू शकत नाही. पण तुमच्या जन्मापूर्वी या जगात आलेली एक व्यक्ती अजूनही फिट आहे, हे ऐकल्यावर तुम्हाला धक्का बसेल. ती व्यक्ती आहे एक महिला क्रिकेटपटू आणि त्यांचे वय आहे तब्बल 107 वर्ष. इलिन अॅश या इंग्लंडच्या माजी महिला क्रिकेटपटू आज 107 वर्षांच्या झाल्या आहेत. पण वय 107 असूनही त्या पूर्णपणे फिट आहेत. या साऱ्या गोष्टीचे श्रेय त्यांनी योगाला दिले आहे.

107 वर्षांच्या अॅश यांचा योगा पाहून थक्क व्हाल

अॅश यांनी 1937 साली इंग्लंडकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या गोष्टीला 2017 साली तब्बल 80 वर्षे पूर्ण झाली होती. त्याचवेळी महिलांचा विश्वचषकही खेळवला जात होता. या निमित्ताचे औचित्य साधून सामन्यापूर्वी घंटानाद करण्याचा मान अॅश यांना देण्यात आला होता.

टॅग्स :इंग्लंडयोग