आजपासून सुरू झालेल्या विजय हजारे ट्रॉफी ( VijayHazareTrophy) स्पर्धेच्या पहिल्याच सामन्यात इशान किशनच्या ( Ishan Kishan ) आतषबाजीचा मनमुराद आनंद लुटला गेला. IPL मध्ये मुंबई इंडियन्स ( Mumbai Indians) संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या इशानकडे झारखंड संघाचे नेतृत्व आहे. आज इंदूर येथे खेळल्या गेलेल्या मध्य प्रदेश संघाविरुद्धच्या सामन्यात इशाननं ११ षटकार आणि १९ चौकारांची बरसात केली. इशानने ९४ चेंडूंत १७३ धावा केल्या. यापैकी ७१ धावा या अखेरच्या २० चेंडूंत कुटल्या. ( Ishan Kishan's last 71 runs came in 20 balls).
इशानच्या या खेळीच्या जोरावर झारखंडने ५० षटकांत ९ बाद ४२२ धावांचा डोंगर उभा केला. विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेतील ही सर्वोच्च धावसंख्या ठरली. इशानने पहिल्या ५० धावांसाठी ४२ चेंडू खेळले. विराट सिंग (६८), सुमीत कुमार ( ५२) आणि अनुकूल रॉय ( ७२) यांनीही हात धुवून घेतले. प्रत्युत्तरात मध्य प्रदेशचे ५ फलंदाज ७४ धावांत माघारी परतले आहेत.
इशाने यूएईत झालेल्या आयपीएलमध्ये ५१६ धावा कुटल्या होत्या
Web Title: 11 sixes, 19 fours: Ishan Kishan slams breathtaking ton in Vijay Hazare Trophy, Mumbai Indians react
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.