Cheteshwar Pujara : इंग्लंडमध्ये कौंटी क्रिकेट गाजवल्यानंतर भारताच्या कसोटी संघाचा फलंदाज चेतेश्वर पुजारा Royal London One-Day Cup स्पर्धेत धुमाकूळ घालतोय. ससेक्स क्लबकडून खेळणाऱ्या पुजाराने मंगळवारी Middlesex क्लबच्या गोलंदाजांची धुलाई केली. पुजाराने या स्पर्धेतील 8 सामन्यांतील तिसरे शतक पूर्ण करताना यंदाच्या पर्वात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये दुसरे स्थान पटकावले. टॉम अॅल्सोपनेही शतक झळकावून Sussexला मोठ्या धावसंख्येच्या दिशेने वाटचाल करून दिली. पुजाराचे यंदाच्या इंग्लिश सत्रातील हे आठवे शतक ठरले. त्याने कौंटी क्रिकेटमध्ये पाच व आता वन डे क्रिकेटमध्ये तीन शतक झळकावली आहेत.
प्रथम फलंदाजीला आलेल्या ससेक्सच्या टॉम व एली ओर यांनी 74 धावांची भागीदारी केली. ओर 20 धावांवर माघारी परतला आणि टॉम क्लार्कही 9 धावा करून माघारी गेला. 2 बाद 95 अशी धावसंख्या असताना पुजारा मैदानावर आला अन् इंग्लिश गोलंदाजांची धुलाई करू लागला. टॉमसह त्याने तिसऱ्या विकेटसाठी 150+ पार भागीदारी केली. ही खेळी साकारताना पुजाराने या स्पर्धेत 500+धावांचा टप्पा ओलांडणाऱ्या दुसऱ्या फलंदाजाचा मान पटकावला.
पुजाराने 109 डावांत List A क्रिकेटमध्ये 5000 धावांचा टप्पा ओलांडला. त्याची सरासरी ही 57.76 इतकी आहे आणि लिस्ट ए क्रिकेटमध्ये किमान 5000 धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये ही दुसरी सर्वोत्तम सरासरी आहे. मिचेल बेवन 57.86 च्या सरासरीने अव्वल स्थानावर आहे. पुजाराने आज 75 चेंडूंत 14 चौकार व 2 षटकारांसह 100 धावा पूर्ण केल्या. या शतकामुळे या स्पर्धेत त्याच्या 8 सामन्यांत 582* धावा झाल्या आहेत. त्याची धावांची सरासरी ही 107.50 इतकी आहे. ससेक्सच्या 41 षटकांत 2 बाद 279 धावा झाल्या आहेत.
Web Title: 14 fours, 2 sixes! Cheteshwar Pujara completed hundred from just 75 balls in RLODC 2022 for Sussex against Middlesex, video
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.