Join us  

कोहलीचा 'बल्ला',घडाळ्याच्या काट्यांवर कल्ला! या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक तास केलीय फटकेबाजी

१६ गुणांसह भारतीय संघ विश्वचषकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 1:53 PM

Open in App

वन-डे विश्वचषक २०२३च्या स्पर्धेत भारतीय संघाने दक्षिण अफ्रिकेला पराभूत करुन आपला विजयरथ कायम ठेवताना सलग आठवा विजय मिळवला. रविवारी भारतीय संघाचा नेदरलँड्सविरुद्ध शेवटचा सामना असेल. १६ गुणांसह भारतीय संघ विश्वचषकाच्या गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. भारत आणि दक्षिण आफ्रिका, आणि ऑस्ट्रेलिया या संघांनी उपांत्य फेरीचे तिकिट मिळवले आहे. तर उपांत्य फेरीचे चौथ स्थान पटकवण्यासाठी तीन संघ अद्याप शर्यतीत आहेत. यामध्ये पाकिस्तान, न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानचा समावेश आहे.

२०२३च्या विश्वचषकात शानदार फलंदाजी करताना भारतीय संघाचा विराट कोहलीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. वनडे फॉरमॅटमध्ये सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके झळकावण्याच्या बाबतीत विराट कोहलीने सचिन तेंडुलकरची बरोबरी केली आहे. यासोबतच कोहलीच्या नावावर आणखी एक खास विक्रम नोंदवला गेला आहे. या विश्वचषकात फलंदाजीसाठी सर्वाधिक वेळ क्रीजवर घालवणारा तो फलंदाज ठरला आहे. 

मीडिया रिपोर्ट्सनुसार, विराटने या विश्वचषकात आतापर्यंत फलंदाजीसाठी जवळपास १४ तास ३९ मिनिटे क्रीजवर घालवली आहेत. याबाबतीत बाकीचे भारतीय खेळाडू खूप मागे आहेत. रोहित शर्मा दुसऱ्या क्रमांकावर आहे. रोहितने ८ तास २३ मिनिटे घालवली. केएल राहुल तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ७ तास २० मिनिटे घालवली. श्रेयस अय्यर चौथ्या आणि शुभमन गिल पाचव्या स्थानावर आहे. अय्यर यांनी ६ तास २९ मिनिटे घालवली. तर गिलने ५ तास ५२ मिनिटे घालवली.

दरम्यान, यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतील कोहलीच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर ते खूप चांगले राहिले आहे. त्याने दोन शतके आणि ४ अर्धशतके केली आहेत. कोहलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नाबाद १०१ धावांची खेळी केली. बांगलादेशविरुद्ध नाबाद १०३ धावा केल्या. न्यूझीलंडविरुद्ध शतक झळकावण्यास तो चुकला होता. कोहलीने ९५ धावा केल्या होत्या. श्रीलंकेविरुद्ध ८८ धावा करून बाद झाला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध ८५ धावा करून बाद झाला. अफगाणिस्तानविरुद्ध नाबाद ५५ धावा केल्या. विश्वचषकाचा पहिला उपांत्य सामना १५ नोव्हेंबरला आणि दुसरा उपांत्य सामना १६ नोव्हेंबरला होणार आहे. अंतिम सामना १९ नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे होणार आहे.

टॅग्स :विराट कोहलीभारतीय क्रिकेट संघरोहित शर्मावन डे वर्ल्ड कप