मुंबई - भारताचा ग्रँडमास्टर १४ वर्षीय प्रज्ञानंदने जर्मनीचा आंतरराष्ट्रीय मास्टर बुकेल्स विरुध्द निर्णायक अकराव्या साखळी फेरीत कोणताही धोका न पत्करता डाव बरोबरीत सोडविला आणि जागतिक युवा बुध्दिबळ स्पर्धेमधील खुल्या १८ वर्षांखालील गटात अपराजित राहून सर्वाधिक साखळी ९ गुणांसह अजिंक्यपद पटकाविले. भारताचा आंतरराष्ट्रीय मास्टर अर्जुन कल्याणने प्रथम मानांकित आर्मेनियाचा ग्रँड मास्टर शांत सर्गस्यानला बरोबरीत रोखून चेन्नईच्या प्रज्ञानंदचे निर्विवाद विजेतेपद सुकर केले.
भारताने या अजिंक्यपद स्पर्धेत चमकदार कामगिरी करत तब्बल सहा पदकांची कमाई केली.त्यामध्ये तीन रौप्यपदकांचा समावेश आहे. भारताला 16 वर्षाखालील मुलींच्या गटात पदक मिळाले नाही. अक्षयाला अनौशा महादीनकडून अंतिम फेरीत पराभूत व्हावे लागले. 14 वर्षाखालील मुलींच्या गटात दिव्या देशमुख व रक्षिता रवी यांनी भारताला दोन पदक मिळवून दिले. महिला आंतरराष्ट्रीय मास्टर असलेल्या दिव्याने विजय मिळवत रौप्यपदक मिळवले. रक्षिताने एरडेने मुंगुंझुलला पराभूत करत कांस्यपदक पटकावले. या गटात कझाकस्तानच्या मेरूएर्ट कमालीदेनोवाने सलग पाच विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले.
फिडे मास्टर एल आर श्रीहरी (14 वर्षाखालील) व वंतिका अग्रवाल (16 वर्षाखालील मुली) यांनी भारताला आणखीन दोन सुवर्णपदक मिळवून दिले.त्याने आपापल्या लढतीत ड्रॉ ची नोंद केली. वंतिका सुवर्णपदक मिळवण्याची संधी होती जर अव्वल मानांकित पोलिना शुवालोवा (8.5 गुण) हिने ड्रॉ खेळला असता. पण, वंतिकाने रशियाच्या अॅलेक्सझांद्रा ओबोलेनतसेवाला पराभूत करता आले नाही.
श्रीहरी (8 गुण) हा देखील सुवर्णपदक मिळवण्याच्या शर्यतीत होता. पण, ड्रॉ ची नोंद केल्याने तो दुसऱ्या स्थानी राहिला. एस मरालाक्षिकारीने कांस्यपदक मिळवले.तिने आर अबीनंधनला पराभूत केले.16 वर्षाखालील खुल्या गटात आरोन्यक घोष (8 गुण) याने भारतासाठी आणखीन एक कांस्यपदक पटकावले. त्याने इराणच्या आराश दाघलीसोबत ड्रॉ ची नोंद केली.
Web Title: 14-year-old Praggnanandhaa wins the GOLD for Indian in the Under 18 World Youth Chess Championship
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.