Join us  

T20 World Cup 2022: आशियाई 'किंग्ज' श्रीलंका जग जिंकण्यासाठी सज्ज; मैदानावर उतरवला १५ सदस्यीय तगडा संघ

टी-२० विश्वचषकासाठी १५ सदस्यीय श्रीलंकेच्या संघाची घोषणा झाली आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2022 4:51 PM

Open in App

नवी दिल्ली : आशिया चषकासाठी (Asia Cup 2022) श्रीलंकेच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर होणाऱ्या या स्पर्धेसाठी जवळपास सर्व संघ जाहीर झाले आहेत. आशिया चषकाचा सहाव्यांदा किताब पटकावल्यानंतर श्रीलंकेचा संघ जगावर राज्य करण्यासाठी सज्ज झाला आहे. दासुन शनाकाच्या नेतृत्वात पुन्हा एकदा श्रीलंकन संघ मोठ्या व्यासपीठावर दिसणार आहे. ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर होणाऱ्या या विश्वचषकात एकूण १६ संघ सहभागी होणार आहेत, ८ संघांनी आधीच पात्रता फेरी गाठली आहे. उरलेल्या आठ संघांमध्ये पहिले क्वालिफायर सामने खेळवले जातील आणि यापैकी पात्र ठरलेले चार संघ सुपर-१२ च्या फेरीत खेळतील. श्रीलंकेच्या संघासमोर पात्रता फेरी पार करून सुपर-१२ मध्ये स्थान मिळवण्याचे आव्हान असणार आहे. 

आशियाई 'किंग्ज' श्रीलंका जग जिंकण्यासाठी सज्जअलीकडेच पार पडलेल्या आशिया चषक २०२२ चा मानकरी श्रीलंकेचा संघ ठरला होता. पाकिस्तानसारख्या बलाढ्य संघाला सलग दोन सामन्यात पराभवाची धूळ चारून श्रीलंकेने सहाव्यांदा आशियावर आपले नाव कोरेल. आगामी टी-२० विश्वचषकात देखील श्रीलंकेचा संघ दासुन शनाकाच्या नेतृत्वात मैदानात असणार आहे. आशिया चषकात श्रीलंकेला आपल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानकडून दारूण पराभवाचा सामना करावा लागला होता. मात्र शानदार पुनरागमन करत श्रीलंकेच्या संघाने ट्ऱॉफीवर कब्जा केला. 

टी-२० विश्वचषकासाठी श्रीलंकेचा संघ दासुन शनाका (कर्णधार), धनुष्का गुनाथिलका, पथुम निसंका, कुसल मेंडिस, चरित असलंका, बानुका राजपक्षे, धनंजया डी सिल्वा, वानिदू हसरंगा, महेश थिक्शाना, जेफ्री वांडरसे, चमिका करूणारत्ने, दुष्मंथा चमीरा, लहिरू कुमारा, दिलशान मधुशंका, प्रमोद मधुशान. 

स्टॅंड बाय खेळाडू - शेन बंडारा, प्रवीण जयविक्रेमा, दिनेश चंडीमल,  बिनुरा फर्नांडो, नुवानिंदू फर्नांडो, 

टी-20 विश्वचषकात सुपर-१२ पूर्वी आठ संघांमध्ये सामने खेळवले जातील. हे आठ संघ दोन गटात आमनेसामने असतील. दोन्ही गटातील अव्वल दोन संघ सुपर-१२ सामन्यांसाठी पात्र ठरतील. यामध्ये नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँडचे संघ अ गटात खेळतील, तर ब गटात आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे हे संघ असतील. 

पहिला राउंड अ गट - नामिबिया, श्रीलंका, संयुक्त अरब अमिराती आणि नेदरलँड.

ब गट - आयर्लंड, स्कॉटलंड, वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे. 

सुपर-12 फेरीगट 1 - अफगाणिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड, अ गटातील विजेता आणि ब गटातील उपविजेता.

गट 2 - बांगलादेश, भारत, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, अ गटातील उपविजेता आणि ब गटातील विजेता. 

 

टॅग्स :ट्वेंटी-२० वर्ल्ड कप २०२2टी-20 क्रिकेटश्रीलंकाआयसीसी
Open in App