Join us  

Rohit Sharma Special Message : रोहित शर्माने पोस्ट केलं पत्र, वाचून चाहते भावूक; नेमकं असं काय लिहिलंय त्यात?

Rohit Sharma completes 15 years in international cricket: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने गुरुवारी सोशल मीडियावर एक खास पत्र पोस्ट केले.

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 3:33 PM

Open in App

Rohit Sharma completes 15 years in international cricket: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने गुरुवारी सोशल मीडियावर एक खास पत्र पोस्ट केले. रोहित सध्या टीम इंडियासोबत इंग्लंड दौऱ्यावर आहे आणि आजपासून भारत व लेईसेस्टर क्लब यांच्यातल्या सराव सामन्याला सुरूवात झालेली आहे. रोहितने १५ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी टीम इंडियाची जर्सी पहिल्यांदा परिधान केली होती. या १५ वर्षांच्या कारकीर्दित रोहितने अनेक चढ उतार पाहिले आणि आज तो टीम इंडियाच्या तीनही संघांचा कर्णधार आहे. रोहितने चाहत्यांसाठी आज खास पत्र लिहिले...

रोहितच्या नावावर २३० वन डे क्रिकेटमध्ये ९२८३ धावा, ४५ कसोटींत ३१३७ धावा आणि १२५ ट्वेंटी-२० सामन्यांत ३३१३ धावा आहेत. त्याने एकूण ४१ शतकं व ८४ अर्धशतकं आहेत. रोहित लिहितो,''माझी आवडती ब्लू जर्सी घालून आज १५ वर्ष झाली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आजच्याच दिवशी १५ वर्षांपूर्वी मी भारताकडून पदार्पण केले होते. हा प्रवास संपूर्ण आयुष्यभर लक्षात राहिल असा अविस्मरणीय आहे. या प्रवासात माझ्यासोबत असलेल्या आणि मला मदत करणाऱ्या प्रत्येकाचे मी आभार मानतो.'' 

रोहित शर्माचे पाच विक्रम

  • वन डे क्रिकेटमध्ये भारताकडून सर्वाधिक शतकं झळकावणाऱ्या फलंदाजांमध्ये सचिन तेंडुलकर ( ४९) व विराट कोहली ( ४३) यांच्यानंतर रोहित शर्माचा ( २९) क्रमांक येतो.  
  • वन डे क्रिकेटमध्ये ८ डावांत १५०+ धावा करणारा रोहित हा एकमेव फलंदाज आहे आणि त्याने डेव्हिड वॉर्नर व सचिन तेंडुलकर यांचा विक्रम मोडला आहे.
  • वन डे क्रिकेटमध्ये सर्वात जलद ( ८३ डाव) ४००० धावा करणारा तो भारतीय सलामीवीर आहे... हाशिम आमलानंतर जगात रोहितचा दुसरा क्रमांक येतो.  
  • रोहित शर्माच्या नावावर वन डे क्रिकेटमध्ये ३ द्विशतकं आहेत. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १ व श्रीलंकेविरुद्ध २ अशी तीन द्विशतकं झळकावली आहेत आणि असा पराक्रम करणारा तो एकमेव फलंदाज आहे  
  • रोहित  शर्माची २६४ धावांची खेळी ही वन डे क्रिकेटमधील सर्वोत्तम वैयक्तिक खेळी आहे. 
टॅग्स :रोहित शर्माभारतीय क्रिकेट संघ
Open in App