नवी दिल्ली : इंडियन प्रीमिअर लीगच्या (आयपीएल) लिलावामध्ये विक्रमी रक्कम मिळविणारा आॅस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्सने सहा महिन्यामध्ये जीवन बदलले नसल्याचे म्हटले आहे. कारण यश किंवा अपयशामुळे प्रभावित होणारी व्यक्ती नसल्याचे कमिन्स म्हणाला.जागतिक क्रमवारीतील अव्वल कसोटी गोलंदाज कमिन्सला कोलकाता नाईट रायडर्सने विक्रमी १५ कोटी ५० लाख रुपयांना करारबद्ध केले होते. त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात तो सर्वांत महागडा विदेशी खेळाडू ठरला होता.विराट कोहलीप्रमाणे कमिन्ससाठी कसोटी क्रिकेट सर्वोच्च स्थानी आहे. कमिन्स म्हणाला,‘मी कसोटी क्रिकेट बघून आणि त्यावर प्रेम करीत मोठा झालो. माझ्या मते हे सर्वांत आव्हानात्मक क्रिकेट आहे. कारण यात कौशल्य, स्टॅमिना आणि मानसिक कणखरतेची परीक्षा होते.’क्रिकेट आॅस्ट्रेलियाने आपल्या खेळाडूंना आऊटडोअर सरावाची परवानगी दिली आहे आणि या वेगवान गोलंदाजाने नेट््समध्ये सरावाला सुरुवात केली आहे. आॅस्ट्रेलियातर्फे २१.८२ च्या प्रभावी सरासरीने ३० कसोटी सामन्यात १४३ बळी घेणारा कमिन्स म्हणाला,‘पूर्ण वेग व फिटनेस मिळविण्यासाठी काही महिने लागतील, पण आमच्याकडे वेळ आहे. आम्ही दोन आठवड्यापूर्वी गोलंदाजीच्या सरावाला सुरुवात केली आहे. त्यामुळे आम्ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटसाठी वेळेत सज्ज असू.’कमिन्सच्या मते टी-२० क्रिकेटने सुरुवात करणे योग्य ठरेल आणि संभाव्य कसोटी सामन्यापर्यंत (अफगाणिस्तानविरुद्ध एक कसोटी आणि त्यानंतर भारताविरुद्ध मालिका) आम्ही पाच दिवसीय क्रिकेटसाठी सज्ज असू.कमिन्स भारताविरुद्ध अॅडिलेडमध्ये ११ ते १५ डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या पहिल्या दिवस-रात्र कसोटीबाबत उत्साहित आहे. तो म्हणाला,‘आम्हाला गुलाबी चेंडूने कसोटी खेळणे आवडते, विशेषता अॅडिलेडमध्ये. तेथे प्रेक्षकांची गर्दी असते.’कोविड-१९ महामारीमुळे होणाºया बदलांमुळे चिंतित नाही. काही बदल करावे लागतील, पण क्रिकेट असा खेळ आहे की त्यात आम्ही अन्य खेळाडूंच्या थेट संपर्कात येत नाही. त्यामुळे फार बदल करावे लागतील, असे मला वाटतनाही.’ ( वृत्तसंस्था)कमिन्स म्हणाला, ‘माझ्या जीवनात काहीच बदल झाला नाही. मी प्रत्येक लढतीत आपला सर्वोत्तम प्रयत्न करतो आणि यशापयशाचा माझ्या जीवनावर प्रभाव पडू नये, यासाठी प्रयत्नशील असतो.’
- Cricket Buzz»
- बातम्या»
- १५.५० कोटीने जीवन बदलले नाही - पॅट कमिन्स
१५.५० कोटीने जीवन बदलले नाही - पॅट कमिन्स
जागतिक क्रमवारीतील अव्वल कसोटी गोलंदाज कमिन्सला कोलकाता नाईट रायडर्सने विक्रमी १५ कोटी ५० लाख रुपयांना करारबद्ध केले होते. त्यामुळे आयपीएलच्या इतिहासात तो सर्वांत महागडा विदेशी खेळाडू ठरला होता.
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 2:36 AM