पाकिस्तानचा युवा क्रिकेटपटू नसीम शाहच्या आईचे आठवड्याभरापूर्वी निधन झाले. पण आता तो संघाबरोबर आहे. पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये कसोटी सामना आजपासून सुरू झाला आणि त्यात नसीमला खेळण्याची संधी मिळाली. 16 वर्ष आणि 279 दिवसांच्या नसीमनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करून युवा कसोटीवीरांमध्ये स्थान पटकावले. पण, अवघ्या 74 दिवसांच्या फरकानं त्याला महान फलंदाज सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडता आला नाही.
हझन रझा ( पाकिस्तान) - 14 वर्ष, 227 दिवसः पाकिस्तानच्या या खेळाडूनं ऑक्टोबर 1996 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध कसोटी संघात पदार्पण केले. त्यावेळी त्याचं वय होतं 14 वर्ष, 227 दिवस. त्यानं पहिल्याच कसोटीत 27 धावा केल्या. कारकिर्दीत त्याला 7 कसोटी खेळता आल्या. पण, पाकिस्तानमध्ये वय चोरी हे प्रकार नवीन नाही. रझा यानंही वयचोरी केली होती. पण, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात युवा खेळाडू म्हणून त्याचीच नोंद आहे.
मुश्ताक मोहम्मद ( पाकिस्तान) - 15 वर्ष, 124 दिवसः मुश्ताकनं 1959मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध लाहोर कसोटीत पदार्पण केलं. त्यानं पहिल्या कसोटीत निराश केलं. कारकिर्दीत त्यानं 57 सामन्यांत 3643 धावा केला आणि 79 विकेट्स घेतल्या. कसोटी क्रिकेमध्ये शतक झळकावणाऱ्या युवा फलंदाजाचा विक्रम मुश्ताकच्या नावावर आहे. त्यानं भारताविरुद्ध 17व्या वर्षी शतक झळकावले.
मोहम्मद शरीफ ( बांगलादेश ) - 15 वर्ष, 128 दिवसः मुश्ताक मोहम्मदच्या विक्रमाशी चार दिवसांच्या फरकानं बांगलादेशच्या मोहम्मद शरीफनं 2001मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध पदार्पण केले. त्याची आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकीर्द 10 सामन्यांपूरतीच राहिली. त्यानं त्यात 122 धावा आणि 14 विकेट्स घेतल्या आहे.
आकिब जावेद ( पाकिस्तान) - 16 वर्ष, 189 दिवसः पाकिस्तानच्या या खेळाडूनं 1989मध्ये न्यूझीलंडविरुद्ध पदार्पण केलं. त्याला 22 सामन्यांत 54 विकेट्स आणि 101 धावाच करता आल्या.
सचिन तेंडुलकर ( भारत) - 16 वर्ष, 205 दिवसः भारताचा महान फलंदाज तेंडुलकरनं 1989मध्ये पाकिस्तानविरुद्ध कसोटीत पदार्पण केले. त्याला पहिल्या सामन्यात केवळ 15 धावा करता आल्या, परंतु त्यानंतर त्यानं जगावर राज्य गाजवलं. त्यानं 200 सामन्यांत 15921 धावा केल्या आणि 46 विकेट्सही घेतल्या.
पाकिस्तानच्या नसीम शाहनं आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी पदार्पण केलं. त्याचे वय 16 वर्ष व 279 दिवसांचा आहे. कसोटीत पदार्पण करणाऱ्या युवा खेळाडूंमध्ये तो नवव्या स्थानावर आहे.
Web Title: As 16-year-old Naseem Shah makes Test debut for Pakistan, a look at youngest debutants in longest format
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.