17-year-old Jharkhand wicketkeeper Kumar Kushagra - झारखंड विरुद्ध नागालँड यांच्यातल्या Ranji Trophy स्पर्धेतील उपउपांत्य फेरीच्या लढतीत मोठ्या विक्रमाची नोंद झाली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या झारखंडने दुसऱ्या दिवसाच्या टी ब्रेकपर्यंत ९ बाद ७०२ धावांचा डोंगर उभा केला. यात १७ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाज कुमार कुशग्रा, विराट सिंग व शाहबाज नदीम यांनी दमदार खेळ केला. कुमार कुशग्राने २६६ धावांची खेळी करताना पाकिस्तानचे दिग्गज जावेद मियाँदाद ( Javed Miandad ) यांचा ४७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
उत्कर्ष सिंग ( ३६) व मोहम्मद नाझीम ( २८) यांना फार मोठी खेळी करता आली नाही. कर्णधार सौरभ तिवारी २९ धावांवर माघारी परतला. कुमार सुरजने ६६ आणि विराट सिंगने १०७ धावांची खेळी करताना झारखंडचा डाव सावरला. विराटने १५५ चेंडूंत १३ चौकारांच्या मदतीने शतकी खेळी केली. त्यानंतर कुमार कुशग्राने २६९ चेंडूंत ३७ चौकार व २ षटकारांसह २६६ धावा कुटल्या. कुमार हा २०२०च्या १९ वर्षांखालील वर्ल्ड कप संघाचा सदस्य होता. त्यानंतर अनुकूल रॉय ( ५९ ) व शाहबाज नदीम ( ८७ खेळतोय) यांनी अर्धशतकी खेळी करून संघाला ७०० पार पल्ला गाठून दिला.
रणजी करंडक स्पर्धेत झारखंडकडून ही दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक खेळी ठरली. इशान किशनने २०१६मध्ये मुंबईविरुद्ध २७३ धावा केल्या होत्या. विशेष म्हणजे इशान व कुमार हे दोघेही यष्टिरक्षक आहेत आणि ६व्या क्रमांकावर फलंदाजी करताना हा विक्रम केला.
कुमार हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये २५०+ धावा करणारा युवा फलंदाज ठरला. त्याचे आताचे वय हे १७ वर्ष व १४१ दिवस आहे. यासह त्याने १९७५मध्ये जावेद मियाँदाद यांनी १७ वर्ष व ३११ दिवसांचे असताना कराची व्हाईट संघाकडून NBP विरुद्धचा विक्रम मोडला. इशानने १८ वर्ष व १११ दिवासंचे असताना अशी कामगिरी केली होती.
Web Title: 17-year-old Jharkhand wicketkeeper Kumar Kushagra has smashed 266 off 269 balls in the Ranji Trophy pre-quarter-final fixture against Nagaland
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.