17-year-old Jharkhand wicketkeeper Kumar Kushagra - झारखंड विरुद्ध नागालँड यांच्यातल्या Ranji Trophy स्पर्धेतील उपउपांत्य फेरीच्या लढतीत मोठ्या विक्रमाची नोंद झाली. प्रथम फलंदाजी करणाऱ्या झारखंडने दुसऱ्या दिवसाच्या टी ब्रेकपर्यंत ९ बाद ७०२ धावांचा डोंगर उभा केला. यात १७ वर्षीय यष्टिरक्षक-फलंदाज कुमार कुशग्रा, विराट सिंग व शाहबाज नदीम यांनी दमदार खेळ केला. कुमार कुशग्राने २६६ धावांची खेळी करताना पाकिस्तानचे दिग्गज जावेद मियाँदाद ( Javed Miandad ) यांचा ४७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला.
- Cricket Buzz»
- बातम्या»
- Kumar Kushagra: ३७ चौकार, २ षटकार; भारताचा १७ वर्षीय फलंदाज जावेद मियाँदादवर भारी पडला; ४७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
Kumar Kushagra: ३७ चौकार, २ षटकार; भारताचा १७ वर्षीय फलंदाज जावेद मियाँदादवर भारी पडला; ४७ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
झारखंड विरुद्ध नागालँड यांच्यातल्या Ranji Trophy स्पर्धेतील उपउपांत्य फेरीच्या लढतीत मोठ्या विक्रमाची नोंद झाली
By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2022 2:55 PM