Ranji Trophy quarter-final Marathi News :सर्फराज खानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पहिल्याच कसोटी सामन्यांत दोन्ही डावांत अर्धशतकी खेळी करून मैदान गाजवले. आता त्याच्या पावलावर पाऊल टाकून मुशीर खान Musheer Khan) रणजी करंडक स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत मुंबईकडून मैदान गाजवतोय. BKC येथे सुरू असलेल्या बडोद्याविरुद्धच्या रणजी करंडक स्पर्धेच्या सामन्यात मुशीरने नाबाद २०३ धावा करून मुंबईचा डाव सावरला...
प्रथम फलंदाजी करायला आलेल्या पृथ्वी शॉ याने आक्रमक खेळ करताना ६ चौकारांच्या मदतीने ३३ धावा चोपल्या. पण, दुसरा सलामीवीर भुपेन लालवानी ( १९) बाद झाला. भार्गव भटने मुंबईच्या दोन्ही सलामीवीरांना माघारी पाठववे. त्यानंतर कर्णधार अजिंक्य रहाणे ( २), सुर्यांश शेडगे ( २०), शार्दूल ठाकूर ( १७) व तुषार देशपांडे ( ०) यांचीही विकेट भटने घेतली. मुशीर एका बाजूने मैदान गाजवत होता आणि त्याला हार्दिक तामोरेची साथ मिळाली. हार्दिकने २४८ चेंडूंत ५७ धावांची संयमी खेळी केली.
मुशीरने ३५७ चेंडूंत १८ चौकारांच्या मदतीने नाबाद २०३ धावा केल्या. मुंबईचा पहिला डाव ३८४ धावांवर गडगडला. भार्गव भटने ७ व एन राथ्वाने ३ विकेट्स घेतल्या. मुशीरने १८ वर्ष व ३६२ दिवसांचा असताना प्रथम श्रेणी क्रिकेटमधील पहिल्या शतकाचे द्विशतकात रुपांतर केले. मुंबई/बॉम्बेकडून द्विशतक करणारा तो दुसरा युवा फलंदाज ठरला. वसीम जाफरने १९९६-९७ मध्ये १८ वर्ष व २६२ दिवसांचा असताना द्विशतक झळकावले होते.