मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश

अश्विनने केला सर्वाधिक मालिकावीराचा विश्वविक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: October 2, 2024 05:55 AM2024-10-02T05:55:39+5:302024-10-02T05:55:50+5:30

whatsapp join usJoin us
18th consecutive series win at home; India whitewashed Bangladesh | मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश

मायदेशात सलग १८वा मालिका विजय; भारताने बांगलादेशला दिला व्हाइटवॉश

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

कानपूर : जवळपास अडीच दिवसांचा खेळ पावसामुळे वाया गेल्यानंतरही भारतीय संघाने जबरदस्त आक्रमक खेळ करताना बांगलादेशला दुसऱ्या कसोटीत मंगळवारी ७ गड्यांनी नमवले. या दणदणीत विजयासह भारताने दोन कसोटी सामन्यांची मालिका २-० अशी निर्विवादपणे जिंकताना जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेच्या गुणतालिकेतील आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले. 

या मालिकेत शानदार अष्टपैलू खेळ करणारा रविचंद्रन अश्विन मालिकावीर ठरला. त्याने यासह कसोटी इतिहासात सर्वाधिक ११व्यांदा मालिकावीराचा किताब मिळवताना श्रीलंकेचा दिग्गज फिरकीपटू मुथय्या मुरलीधरनच्या विश्वविक्रमाशी बरोबरी केली. दोन्ही डावांत अर्धशतक झळकावणारा यशस्वी जैस्वाल सामनावीर ठरला.  पहिल्या डावात ५२ धावांची आघाडी घेतलेल्या भारताने बांगलादेशचा दुसरा डाव ४७ षटकांत १४६ धावांमध्ये गुंडाळला. यानंतर ९५ धावांचे लक्ष्य घेऊन मैदानात उतरलेल्या भारताने १७.२ षटकांत ३ बाद ९८ धावा करत सहज बाजी मारली. जैस्वालने ४५ चेंडूंत ८ चौकार व एका षटकारासह ५१ धावा केल्या. त्याला विराट कोहलीने चांगली साथ देताना ३७ चेंडूंत ४ चौकारांसह नाबाद २९ धावा केल्या. मेहदी हसन मिराजने दोन, तर तैजुल इस्लामने एक बळी घेतला. 

त्याआधी, जसप्रीत बुमराह (३/१७), रवींद्र जडेजा (३/३४) आणि रविचंद्रन अश्विन (३/५०) यांनी टिच्चून मारा करताना बांगलादेशचे कंबरडे मोडले. पाचव्या दिवशी २ बाद २६ धावांवरून सुरुवात केलेल्या बांगलादेशचा दुसरा डाव ४७ षटकांत केवळ १४६ धावांमध्ये संपुष्टात आला. सलामीवीर शादमन इस्लाम याने १०१ चेंडूंत १० चौकारांसह केलेली ५० धावांची झुंजार खेळी वगळता बांगलादेशकडून कोणालाही छाप पाडता आली नाही. कर्णधार नजमुल हुसेन शंटो (१९) आणि अनुभवी मुशफिकुर रहिम (३७) यांनी थोडीफार झुंज दिली.

धावफलक 
बांगलादेश (पहिला डाव) : ७४.२ षटकांत सर्वबाद २३३ धावा.
भारत (पहिला डाव) : ३४.४ षटकांत ९ बाद २८५ धावा (घोषित).
बांगलादेश (दुसरा डाव) : शादमन इस्लाम झे. जैस्वाल गो. आकाश ५०, झाकिर हसन पायचीत गो. अश्विन १०, हसन महमूद त्रि. गो. अश्विन ४, मोमिनुल हक झे. राहुल गो. अश्विन २, नजमुल शंटो त्रि. गो. जडेजा १९, मुशफिकुर रहिम त्रि. गो. बुमराह ३७, लिट्टन दास झे. पंत गो. जडेजा १, शाकिब अल हसन झे. व गो. जडेजा ०, मेहदी हसन मिराज झे. पंत गो. बुमराह ९, तैजुल इस्लाम पायचीत गो. बुमराह ०, खालेद अहमद नाबाद ५. अवांतर - ९. एकूण : ४७ षटकांत सर्वबाद १४६ धावा.
बाद क्रम : १-१८, २-२६, ३-३६,    ४-९१, ५-९३, ६-९४, ७-९४,       ८-११८, ९-१३०, १०-१४६.
गोलंदाजी : जसप्रीत बुमराह १०-५-१७-३; रविचंद्रन अश्विन १५-३-५०-३; आकाश दीप ८-३-२०-१; मोहम्मद सिराज ४-०-१९-०; रवींद्र जडेजा १०-२-३४-३.
भारत (दुसरा डाव) : रोहित शर्मा झे. हसन गो. मिराज ८, यशस्वी जैस्वाल झे. शाकिब गो. तैजुल ५१, शुभमन गिल पायचीत गो. मिराज ६, विराट कोहली नाबाद २९, ऋषभ पंत नाबाद ४. अवांतर - ०. एकूण : १७.२ षटकांत ३ बाद ९८ धावा. 
बाद क्रम : १-१८, २-३४, ३-९२.
गोलंदाजी : मेहदी हसन मिराज ९-०-४४-२; शाकिब अल हसन ३-०-१८-०; तैजुल इस्लाम ५.२-०-३६-१.

सर्वांत कमी चेंडूंत मिळवलेले 
कसोटी विजय (दोन्ही डाव मिळून)

 इंग्लंड : २७६ चेंडूंत, वेस्ट इंडिजविरुद्ध (ब्रिजटाउन) - १९३५
 भारत : २८१ चेंडूंत, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध (केपटाउन) - २०२४
 दक्षिण आफ्रिका : ३०० चेंडूंत, झिम्बाब्वेविरुद्ध (केपटाउन) - २००५
 भारत : ३१२ चेंडूंत, बांगलादेशविरुद्ध (कानपूर) - २०२४
 ऑस्ट्रेलिया : ३२७ चेंडूंत, दक्षिण आफ्रिकाविरुद्ध (मेलबर्न) - १९३२

कसोटीत दोन्ही डावांत मिळून 
सर्वाधिक धावगती
 ७.३६ : भारत वि. बांगलादेश, कानपूर - २०२४
 ६.८० : दक्षिण आफ्रिका वि. झिम्बाब्वे, केपटाउन - २००५
 ६.७३ : इंग्लंड वि. पाकिस्तान, रावळपिंडी - २०२२
 ६.४३ : इंग्लंड वि. आयर्लंड, लॉर्डस - २०२३
 ५.७३ : इंग्लंड वि. बांगलादेश, चेस्टर-ली-स्ट्रीट - २००५

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक मालिकावीर 
 मुथय्या मुरलीधरन (श्रीलंका)/ रविचंद्रन अश्विन (भारत) : ११ वेळा
 जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) : ९ वेळा
 रिचर्ड हॅडली (न्यूझीलंड)/ इम्रान खान (पाकिस्तान)/ शेन वॉर्न (ऑस्ट्रेलिया) : ८ वेळा

मायदेशात सलग सर्वाधिक कसोटी मालिका विजय
 भारत : १८ (२०१३-२०२४)
 ऑस्ट्रेलिया : १० (१९९४-२०००)
 ऑस्ट्रेलिया : १० (२००४-२००८)
 वेस्ट इंडिज : ०८ (१९७६-१९८६)
 न्यूझीलंड : ०८ (२०१७-२०२०)

सर्वाधिक कसोटी सामने विजय
 ऑस्ट्रेलिया : ४१४ 
 इंग्लंड : ३९७ 
 वेस्ट इंडिज : १८३ 
 भारत : १८० 
 दक्षिण आफ्रिका : १७९ 

Web Title: 18th consecutive series win at home; India whitewashed Bangladesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.