Join us  

Ben Stokes Retire : बेन स्टोक्सपाठोपाठ आणखी दोन स्टार खेळाडूंची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती, क्रिकेट वर्तुळात खळबळ

Ben Stokes Retire : इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने सोमवारी आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 19, 2022 12:56 PM

Open in App

Ben Stokes Retire : इंग्लंडचा स्टार अष्टपैलू खेळाडू बेन स्टोक्स याने सोमवारी आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमधून निवृत्तीचा निर्णय घेतला. क्रिकेटच्या तीनही फॉरमॅट्सना समान न्याय देऊ शतक नसल्यामुळे हा निर्णय घेत असल्याचे 31 वर्षीय स्टोक्सने स्पष्ट केले. स्टोक्सच्या या निर्णयाचा क्रीडा विश्वाला धक्का बसलेला असताना त्याच दिवशी वेस्ट इंडिजच्या दिनेश रामदीन व लेंडल सिमन्स यांनीही आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय जाहीर केला. 18 जुलै 2022 हा दिवस तीन स्टार फलंदाजांच्या निवृत्तीचा ठरल्याने क्रिकेट वर्तुळाला धक्का बसला आहे.

३१ वर्षीय स्टोक्सने २०११मध्ये आयर्लंडविरुद्ध वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि १०४ सामन्यांत त्याच्या नावावर तीन शतकांसह २९१९ धावा व ७४ विकेट्स आहेत. २०१९च्या वर्ल्ड कप फायनलमध्ये त्याने प्लेअर ऑफ दी मॅचचा पुरस्कार पटकावला होता. न्यूझीलंडविरुद्धच्या सुपर ओव्हरपर्यंत रंगलेल्या वर्ल्ड कप फायनल लढतीत स्टोक्सने नाबाद ८४ धावांची अविस्मरणीय खेळी केली होती. 

भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर वन डे व ट्वेंटी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. त्याआधी रामदीन व सिमन्स यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. सिमन्सने 68 वन डेत 1958 धावा केल्या आहेत आणि त्यात दोन शतकांचा समावेश आहे. त्याने आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे प्रतिनिधित्व केले होते आणि आयपीएलमध्ये 29 सामन्यांत त्याच्या नावावर 1079 धावा आहेत. दिनेश रामदीनने 74 कसोटी, 139 वन डे आणि 71 ट्वेंटी-20 सामने खेळले आहेत. त्याने कसोटीत 2898, वन डेत 2200 आणि ट्वेंटी-20त 636 धावा केल्या आहेत. यष्टिरक्षक रामदीनने 400 हून अधिक झेल घेतले आहेत.

टॅग्स :बेन स्टोक्सवेस्ट इंडिज
Open in App