Join us  

पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंवर उपासमारीची वेळ अन् रमीज राजा निघाले BCCI ला टक्कर द्यायला

पाकिस्तानचे जवळपास २०० देशांतर्गत क्रिकेटपटू अजूनही देशांतर्गत हंगामात भाग घेण्यासाठी पगाराच्या प्रतीक्षेत आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2022 2:04 PM

Open in App

पाकिस्तानचे जवळपास २०० देशांतर्गत क्रिकेटपटू अजूनही देशांतर्गत हंगामात भाग घेण्यासाठी पगाराच्या प्रतीक्षेत आहेत. राष्ट्रीय ट्वेंटी-२० कप आणि कायद-ए-आझम ट्रॉफीसह अनेक देशांतर्गत स्पर्धांमध्ये भाग घेतलेल्या १९२ खेळाडूंना ३० ऑगस्टला हंगाम सुरू झाला असूनही मासिक रिटेनर किंवा मॅच फीचे पैसे दिलेले नाहीत. आतापर्यंत, खेळाडूंना फक्त त्यांच्या दैनंदिन खर्चाचे पैसे दिले गेले आहेत. 

भारताला हरवल्यानंतर दुकानदार मला सर्व सामान फुकट देऊ लागले - मोहम्मद रिझवान

अनेक खेळाडूंनी तसेच पीसीबीमधील सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. स्थानिक खेळाडूंच्या मासिक रिटेनर्स आणि मॅच फीमध्ये वाढ करण्याच्या पीसीबीच्या प्रशासकीय मंडळाच्या मंजुरीमुळे उद्भवलेल्या प्रशासकीय समस्यांमुळे हा विलंब झाल्याचे म्हटले जाते. माजी क्रिकेटपटू रमिज राजा यांच्या नेतृत्वाखालील काम करणाऱ्या प्रशासनाच्या गलथानपणाचा देशांतर्गत क्रिकेटपटूंना अनावश्‍यक त्रास सहन करावा लागला आहे. या क्रिकेटपटूंची उपजीविका क्रिकेटवर अवलंबून आहे. पेमेंटमध्ये हा विलंब अशा वेळी आला आहे जेव्हा पाकिस्तानची अर्थव्यवस्था गटांगळ्या खात आहे, रुपयाचे मूल्य घसरले आहे आणि महागाई नोव्हेंबरमध्ये २०% च्या वर गेली आहे. 

२०१९ मध्ये, PCB ने देशांतर्गत संरचनेत सुधारणा केली आणि पारंपारिक प्रादेशिक व विभागीय संघ रद्द केले.  देशातील सर्व सहा प्रांतांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या सहा संघटनांना एका छताखाली आणले. त्याआधी सुई गॅस नॉर्दर्न पाइपलाइन्स (SNGPL) किंवा हबीब बँक (HBL) यांसारख्या विभागांसाठी मोठ्या प्रमाणावर देशांतर्गत क्रिकेटपटू कराराबद्ध होत होते. उर्वरित प्रादेशिक खेळाडूंना पीसीबीने पैसे दिले. नवीन मॉडेलमध्ये जवळपास २ अब्ज रुपयांचा संपूर्ण खर्च पीसीबीने उचलला आहे.

देशांतर्गत खेळाडूंशी साधारणणे ऑगस्ट ते जुलै दरम्यान संपर्क साधला जातो, परंतु पीसीबीने या वर्षी नोव्हेंबरमध्ये करार दिले. कायद-ए-आझम ट्रॉफी पूर्ण झाल्यानंतर डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच त्यांचे करार प्राप्त झाले. जवळपास ८०% खेळाडूंनी करारावर स्वाक्षरी करून त्यांना परत केले आहेत आणि या महिन्यात पैसे मिळण्याची आशा आहे. ( आयसीसीला BCCIकडून छप्परफाड महसूल, पाकिस्तानचा तुटपूंजा वाटा!

पीसीबीने खेळाडूंना पाच श्रेणींमध्ये करार देते. पंधरा खेळाडू A+ श्रेणीमध्ये, ३५ खेळाडू A श्रेणीमध्ये, ४८ खेळाडू श्रेणी B मध्ये, ७० खेळाडू  श्रेणी C आणि २४ खेळाडू D श्रेणीमध्ये असतील. नवीन आर्थिक मॉडेलनुसार कायद-ए-आझम ट्रॉफीमध्ये खेळलेल्या खेळाडूला पाकिस्तानी चलन PKR १ लाख मॅच फी मिळते.  पाकिस्तान चषक आणि नॅशनल ट्वेंटी-२० टूर्नामेंट खेळणाऱ्या खेळाडूंना प्रती सामना PKR ६० हजार मिळतात. न खेळणाऱ्या सदस्यांना लाल आणि पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटमध्ये अनुक्रमे PKR ४० हजार आणि PKR २० हजार प्रति सामना मिळतात. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

टॅग्स :पाकिस्तान
Open in App