आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनं ( आयसीसी) अखेर यंदा ऑस्ट्रेलियात होणारा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्थगित करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) आयसीसीच्या या निर्णयाची चातकासारखी प्रतीक्षा पाहत होते. आता बीसीसीआयचा इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) तेरावा मोसमाचा मार्ग मोकळा झाला आहे. आशिया चषक, इंग्लंडचा भारत दौरा अन् आता ट्वेंटी-20 वर्ल्ड कपही स्थगित झाल्यामुळे बीसीसीआयला आयपीएल खेळवता येणार आहे. पण, आयसीसीनं हे जाहीर करताना 2023मध्ये भारतात होणारा वर्ल्ड कप सहा महिन्यांनी पुढे ढकलला आहे. त्यामुळे 1987नंतर भारतात पुन्हा तो योगायोग घडून येणार आहे. ( 2023 World Cup in India moved to October-November slot by ICC )
Big Breaking : T20 World Cup बाबत आयसीसीनं घेतला मोठा निर्णय; BCCIला दिलासा, पण...
ICC नं पुढील तीन वर्ल्ड कपच्या तारखा केल्या जाहीर; पण बीसीसीआयसमोर टाकलीय 'गुगली'!
यंदाचा स्थगित झालेला वर्ल्ड कप 2022मध्ये ऑस्ट्रेलियात खेळवण्यात येईल. कारण भारताकडे 2021 मधील वर्ल्ड कपचे यजमानपद आहे. पण, असे असले तरी आयसीसीनं 2021 आणि 2022च्या वर्ल्ड कपच्या आयोजकांची नावं जाहीर केलेली नाहीत. कोरोना व्हायरसची परिस्थितीचा आढावा घेऊन त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असे आयसीसीनं स्पष्ट केलं. त्याचवेळी आयसीसीनं 2023चा वन डे वर्ल्ड कप सहा महिन्यांनी पुढे ढकलला आहे. भारतात होणारा हा वर्ल्ड कप फेब्रुवारी-मार्चमध्ये खेळवण्यात येणार होता, परंतु आता तो ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये खेळवण्यात येणार आहे. या वर्ल्ड कपसाठी अन्य संघांना पात्रता फेरी खेळण्यासाठी वेळ मिळावा, यासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. (2023 World Cup in India moved to October-November slot by ICC )
13 संघांची वन डे सुपर लीग, क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 आणि आयसीसी चॅलेंज लीग A आणि B आदी पात्रता फेरींतून वर्ल्ड कपसाठीचे अंतिम संघ निवडले जाणार आहेत. कोरोना व्हायरसमुळे या पात्रता स्पर्धांच्या वेळापत्रकाला फटका बसला आहे. त्यामुळे आयसीसीनं पात्रता फेरीचा कालावधी वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. (2023 World Cup in India moved to October-November slot by ICC )
सुपर लीगमधील अव्वल सात संघ आणि यजमान भारत असे एकूण 8 संघ वन डे वर्ल्ड कपसाठी थेट पात्र ठरतील. उर्वरित पाच संघ क्रिकेट वर्ल्ड कप लीग 2 मध्ये खेळतील. त्यांच्यासह अऩ्य पात्रता फेरीतील दोन सर्वोत्तम संघही असतील. आयसीसीच्या या निर्णयानं 36 वर्षांनी भारतात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये वन डे वर्ल्ड कप होणार आहे. यापूर्वी 1987साली भारत-पाकिस्तान यांच्या संयुक्त विद्यमानपदाखाली 8 ऑक्टोबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत वर्ल्ड कप खेळवण्यात आला होता. (2023 World Cup in India moved to October-November slot by ICC )
पाकिस्तानला मोठा धक्का; चौथ्यांदा कोरोना पॉझिटिव्ह सापडला गोलंदाज
आशिया चषक, ट्वेंटी-20 वर्ल्ड कप रद्द, तरीही 'IPL 2020'च्या मार्गातील अडथळे कायम!
Web Title: 1987 ODI World Cup happened from October 8th to November 8th at India & Pakistan and 36 years later in 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.