कोलंबो : आयपीएलमध्ये शानदार कामगिरी करणाऱ्या अनेक युवा खेळाडूंचा भरणा असलेला भारतीय संघ श्रीलंकेविरुद्ध वन डे मालिका जिंकल्यानंतर आज रविवारपासून तीन सामन्यांची टी-२० मालिका खेळण्यास सज्ज आहे. पहिल्या सामन्यात फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याचे पदार्पण निश्चित मानले जात आहे.
शिखर धवनच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकल्यानंतर काल तिसरा सामना मात्र गमावला होता. तरीही मालिकेत भारताचे पारडे जड मानले जाते. कोच राहुल द्रविड हे टी-२० त ऑफ ब्रेक, कॅरम बॉल टाकणारा आणि लेगब्रेकचा प्रयत्न करणारा वरुण चक्रवर्ती याला संधी देऊ इच्छितात.आयपीएलमध्ये वरुणने कामगिरीची चुणूक दाखविली आहे.तो खराब फिटनेस आणि जखम यामुळे ऑस्ट्रेलिया दौरा करू शकला नव्हता. इंग्लंडविरुद्ध स्थानिक मालिकेतही खेळला नव्हता, मात्र यूएईत होणाऱ्या टी-२० विश्वचषकाआधी संघ व्यवस्थापनाला एका फिरकीपटूचा शोध आहे. अशावेळी २९ वर्षांच्या वरुणला प्रयोग म्हणून खेळविले जाईल.
याशिवाय ऋतुराज गायकवाड आणि देवदत्त पडिक्कल यांच्यापैकी एकाला खेळविले जाईल. संजू सॅमसन आणि इशान किशन हे देखील अंतिम एकादशमध्ये असतील. मनीष पांडे याला मधल्या फळीतून बाहेर केले जाईल . वेगवान माऱ्यासाठी भुवनेश्वर कुमार आणि दीपक चहर तसेच फिरकी गोलंदाजीसाठी चक्रवर्ती आणि कृणाल यांच्यासोबत युजवेंद्र चहल याला संधी दिली जाईल. श्रीलंकेने मायदेशात भारताविरुद्ध नऊ वर्षानंतर सामना जिंकला. ‘भानुका राजपक्ष, चमिका करुणारत्ने आणि अविष्का फर्नांडो या चांगल्या फलंदाजांच्या बळावर आम्ही आव्हान देऊ,’ असे नवा कर्णधार दासून शनाका याने सांगितले.
उभय संघ यातून निवडणारभारत : शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड़, सूर्यकुमार यादव, भुवनेश्वर कुमार (उपकर्णधार), मनीष पांडे, हार्दिक पांड्या, नीतीश राणा, इशान किशन (यष्टिक्षक), संजू सॅमसन (यष्टिक्षक), युजवेंद्र चहल, राहुल चाहर, के गौतम, कुणाल पांड्या, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, दीपक चाहर, नवदीप सैनी, चेतन सकारिया.
श्रीलंका: दासून शनाका (कर्णधार), धनंजय डिसिल्वा, अविष्का फर्नांडो, भानुका राजपक्षा, पथुम निसंका, चरित असलंका, वनिन्दु हसरंगा, आशेन बंडारा, मिनोड भानुका, लाहिरु उदारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, बिनुरा फर्नांडो, दुष्मंथा संदाकन, अकिला धनंजय, शिरन फर्नांडो, धनंजय लक्षण, ईशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रमा, असिथा फर्नांडो, कसुन रजिता, लाहिरु कुमारा, इसुरु उदाना.