क्रीडा वृत्त पोर्टल 1xBat स्पॉर्टींग लाईन्स हे एंटरटेनर्स क्रिकेट लीगच्या दुसर्या सीझनचे पुरस्कर्ते झाले आहेत. लीग 5 मार्च ते 16 मार्च,2025 दरम्यान संपन्न होणार आहे. पहिल्या यशस्वी सीझन नंतर इसीएलचा दुसरा सीझन प्रेक्षकांना अधिक रोमहर्षक सामन्यांची हमखास मेजवानी देऊ करणार आहे. एंटरटेनर्स क्रिकेट लीग ही टी10 या आगळ्या-वेगळ्या प्रकारातील क्रिकेट लीग आहे, ज्यात ख्यातनाम इंनफ्ल्युएंसर्स, करमणूक क्षेत्रातील तारे आणि गुणी होतकरू क्रिकेट खेळाडू एकत्र येतात.
देशाचा लाडका खेळ क्रिकेट आणि मनोरंजन क्षेत्राला एकत्रित घेऊन येणारी इसीएल ही क्रिकेट चाहते आणि इन्प्ल्युएंसर्स यांचे लक्ष वेधण्यात यशस्वी ठरली आहे आणि अल्पावधीत लोकप्रिय झाली आहे. लीग चाहत्यांशी आवर्जून संवाद साधते, खासकरून इंस्टाग्रामद्वारे जिथे नियमित ताजी माहिती आणि घोषणा पोस्ट केल्या जातात. कलाकारांचा सहभाग आणि डिजिटल प्लॅटफॉर्म्स बरोबर एकत्रीकरण करून इसीएल क्रिकेटची लोकप्रियता तरूण वर्गात वाढवायला मदत करत आहे आणि भारतातील पारंपारिक क्रीडा स्पर्धांचा आवाका ही वाढवते.
“एंटरटेनर्स क्रिकेट लीग (इसीएल) प्रमाणेच करमणूक आणि खेळ हे आमच्या व्यवसायाच्या केंद्रस्थानी आहेत. क्रिकेटचा प्रसार व त्याला सहाय्य करणे हे आमचे ध्येय आहे आणि एंटरटेनर्स क्रिकेट लीगची निर्मिती आणि विस्ताराच्या मागेही हेच ध्येय आहे. म्हणूनच लीग बरोबर भागीदारीचा करार करताना आम्हाला आनंद होत आहे कारण यामुळे याचा प्रभाव वाढणार आहे आणि खेळाची लोकप्रियता ही वाढणार आहे,” असे 1xBat चा प्रतिनिधी म्हणाला.
इसीएल मध्ये सहभागी होणार्या संघांमध्ये प्रत्येकी 20 खेळाडू आहेत जे एका लिलावाद्वारे निवडण्यात आले आहेत. या वर्षीचा लिलाव 13 जानेवारी रोजी संपन्न झाला. या वेळच्या लिलावात क्रिकेटपटू बॉबी यादव सर्वात महागडा खेळाडू ठरला जेव्हा लखनऊ लायन्सनी त्याला रू.2.80 कोटींना खरेदी केले. यूट्युबर झाला वनराजसिंह हा दुसरा महागडा खेळाडू ठरला ज्याला बॅंगलोर बॅशर्सनी रू.2.60 कोटींना खरेदी केले. तर हरियाना हंटर्सनी विशाल चौधरीला रू.2.50 कोटींना खरेदी केले. इसीएलच्या दुसर्या सीझनमध्ये एकूण संघांमध्ये ५ वरून आठ एवढी वाढ झाली आहे.
- हरयाणवी हंटर्स – एल्विश यादव कर्णधार (यूट्युबर, गायक)
- लखनऊ लायन्स – अनुराग द्विवेदी (फॅंटसी क्रिकेट तज्ञ, यूट्युबर, क्रिकेट विश्लेषक)
- मुंबई डिसरप्टर्स – कर्णधार मुनावर फारूकी (स्टॅंड-अप कॉमेडियन, यूट्युबर, रॅपर, गायक)
- डायनॅमिक दिल्ली – कर्णधार गौरव तनेजा (यूट्युबर, कंटेंट निर्माता, कमर्शियल पायलट, फिटनेस, लाइफस्टाईल)
- बॅंगलोर बॅशर्स – कर्णधार अभिषेक मल्हान (यूट्युबर, रॅपर, गायक, सोशल मिडिया इंफ्ल्युएन्सर)
- कोलकता सुपररस्टार्स – पुष्कर राज ठाकूर (स्टॉक मार्केट एज्युकेटर, फायनांन्स इंफ्ल्युएन्सर, बिझनेस कोच, यूट्युबर)
- चेन्नई स्मॅशर्स – महेश ठगेश केशवाला (यूट्युबर, कंटेट निर्माता)
- राजस्थान रेंजर्स – झायन सैफी (अभिनेता, यूट्युबर)
यामुळे चाहत्यांना मैदानात नवीन चेहरे बघायला मिळणार तर आहेतच, पण त्याच बरोबर स्पर्धा अधिक दर्जेदार आणि रंगतदार होणार आहे. लीगच्या नियमित सीझनमध्ये सर्व संघ एकमेकांना दोन वेळा सामोरे जातील. असे एकूण 32 सामने होणार आहेत. सीझनच्या शेवटी चार आघाडीचे संघ प्लॅऑफ्स मध्ये सहभागी होतील आणि एंटरटेनर्स क्रिकेट लीगच्या विजेतेपदासाठी एकमेकांत भिडतील. इसीएलच्या पहिल्या सीझनमध्ये एल्विश यादवच्या हरयाणवी हंटर्सनी अजिंक्यपद पटकावले होते. पुरस्कर्ता करारातील अटी व शर्तींनुसार 1xBatचा लोगो स्टेडियम मधील जाहिरात फलकांवर दिसेल. 1xBat ही लीगला आपल्या डिजिटल प्लॅटफॉर्म आणि समाज माध्यमांवर ठळक प्रसिद्धी देईल तर ब्रॅंडच्या सोशल मिडिया पोस्ट्सना इंफ्ल्यूएन्सर्स रिपोस्ट करतील ज्याद्वारे पोस्ट त्यांच्या सबस्क्रायबर्स पर्यंत पोहचेल. अशा प्रकारे 1xBat ला अधिक प्रसिद्धी मिळणार आहे आणि इंस्टाग्राम, यूट्यूब आणि इतर समाज माध्यमे आणि माध्यमांच्या द्वारे तरूण चाहत्यांच्या पर्यंत क्रिकेटचा प्रसारही होऊ शकेल.
1xBat बाबत
1xBat स्पोर्टींग लाईन्स हा भारतातील एक ऑनलाईन न्यूज प्लॉटफॉर्म आहे जिथे क्रीडा क्षेत्रातील महत्त्वाच्या बातम्या मिळू शकतात. 1xBat वापरकर्त्यांना क्रिकेट, फूटबॉल, कब्बडी आणि इतर खेळांच्या बाबतची माहिती दररोज मिळू शकते. साईटच्या अभ्यागतांना टीम्सचे रॅंकींग आणि क्रीडा स्पर्धांच्या बाबतचे अंदाज बघायला मिळू शकतात. 1xBat च्या अधिकृत अॅंबॅसिडर्स मध्ये शिखर धवन आणि मिचेल स्टार्क या प्रसिद्ध क्रिकेटपटूंचा समावेश आहे. याबरोबरच न्यूज पोर्टलने प्रो कबड्डी लीगच्या 11 व्या सिझनसाठी तमिल थलायावाज बरोबर पुरस्कर्ता करार केला आहे. अबु धाबी टी10 2024 क्रिकेट लीगच्या आठव्या सीझनसाठी आणि आयएलटी20 2025 मधील डेझर्ट व्हिस्पर्स संघाबरोबर ‘पॉवर्ड बाय’ पार्टनरचा करार केला आहे.