Join us  

Cheteshwar Pujara Vs Shaheen Afridi : चेतेश्वर पुजारा पाकिस्ताच्या शाहीन आफ्रिदीला पुरून उरला; झळकावली ७ डावांत २ द्विशतकं व २ शतकं, Video 

चेतेश्वर पुजाराची ( Cheteshwar Pujara) कौंटी क्रिकेटमधील कामगिरी दमदारच सुरू आहे. कौंटी च‌ॅम्पियनशीप स्पर्धेत ससेक्स क्लबकडून ( Sussex) खेळणाऱ्या पुजाराने आज MIDDLESEX क्लबच्या गोलंदाजांची धुलाई केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 07, 2022 11:51 PM

Open in App
  • Sussex vs Derbyshire - 6 & 201* ( 14-Apr-2022)
  • Sussex vs WORCS - 109 & 12 ( 21-Apr-2022)
  • Sussex vs Durham - 203  ( 28-Apr-2022)  

चेतेश्वर पुजाराची ( Cheteshwar Pujara) कौंटी क्रिकेटमधील कामगिरी दमदारच सुरू आहे. कौंटी च‌ॅम्पियनशीप स्पर्धेत ससेक्स क्लबकडून ( Sussex) खेळणाऱ्या पुजाराने आज MIDDLESEX क्लबच्या गोलंदाजांची धुलाई केली. विशेष करून पुजारा विरुद्ध पाकिस्तानी गोलंदाज शाहिन शाह आफ्रिदी ( Shaheen Afridi) यांच्यातली ठसन पाहायला मजा आली. आतापर्यंत कौंटी च‌ॅम्पियशीपच्या या पर्वात आपल्या वेगवान माऱ्याने प्रतिस्पर्धी फलंदाजांना हतबल करणाऱ्या आफ्रिदीला आज पुजाराने ईंगा दाखवला. आफ्रिदीने टाकलेला बाऊन्सर पुजाराने सुरेखरित्या अपर कट मारून सीमारेषेपार पाठवला. टीम इंडियात पुनरागमनासाठी सज्ज असलेल्या पुजाराने मागील ७ डावांत दोन द्विशतकं व २ शतकं झळकावली आहेत.

ससेक्सने पहिल्या डावात ३९२ धावा करून मि़ड्लेसेक्स क्लबचा पहिला डाव ३५८ धावांवर गुंडाळला. पुजाराला पहिल्या डावात फक्त १६ धावाच करता आल्या. पण, दुसऱ्या डावात  संघ अडचणीत असताना तो खंबीरपणे उभा राहिला. २ बाद ६ अशी संघाची अवस्था असताना पुजारा मैदानावर आला. त्याने टॉम अॅल्सोपसोबत ससेक्सच्या डावाला आकार दिला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी केली. टॉम ६६ धावांवर माघारी परतला. पण, पुजाराने खिंड लढवली. चौथ्या विकेटसाठी त्याने टॉम क्लार्कसह ९२ धावा जोडल्या.

दिवसाचा खेळ संपला तेव्हा ससेक्सने २७० धावांची आघाडी घेतली आहे.  पुजारा १४९ चेंडूंत १६ चौकार व २ षटकारांसह १२५ धावांवर खेळतोय, तर क्लार्कने नाबाद २६ धावा केल्या आहेत. ससेक्सच्या ३ बाद २३६ धावा झाल्या आहेत.  

टॅग्स :चेतेश्वर पुजाराकौंटी चॅम्पियनशिप
Open in App