भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका ( India Women Vs South Africa Women) यांच्यातल्या चौथ्या वन डे सामन्यात टीम इंडियाची कर्णधार मिताली राज ( Mithali Raj) हिनं आणखी एक वर्ल्ड रेकॉर्ड नावावर केला. तिसऱ्या वन डे सामन्यात मितालीनं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १०००० धावा करणाऱ्या पहिल्या भारतीय महिला खेळाडूचा मान पटकावला होता. त्यानंतर तिनं चौथ्या वन डे सामन्यातही आणखी एक विक्रम नावावर केला. वन डे क्रिकेटमध्ये ७००० धावा करणारी ती जगातली पहिली महिला क्रिकेटपटू ठरली. ( Mithali Raj becomes the first player to reach 7000 runs in Women's ODIs)
प्रथम फलंदाजी करताना भारतानं ४ बाद २६६ धावा केल्या. पूनम राऊतनं ( Punam Raut) १२३ चेंडूंत १० चौकारांसह १०४ धावा केल्या. कर्णधार मितालीनं ७१ चेंडूंत ४ चौकारांसह ४५ धावा केल्या. हरमनप्रीत कौरनं ( Harmanpreet Kaur ) ३५ चेंडूंत ७ चौकार व १ षटकार खेचून ५४ धावा चोपल्या. Prithvi Shaw : पृथ्वी शॉ याची आणखी एक वादळी खेळी; नोंदवला विराट कोहली, महेंद्रसिंग धोनी यांनाही न जमलेला विक्रम
वन डे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या महिला खेळाडू ( Most runs in Women's ODIs)
मिताली राज - ७०१९
चार्लोट एडवर्ड्स - ५९९२
बेलिंडा क्लार्क - ४८४४
कॅरेन रोल्टन - ४८१४
स्टेफनी टेलर - ४७५४
वन डे क्रिकेटमध्ये धावांचा पल्ला गाठणाऱ्या पहिल्या महिला खेळाडू
१००० धावा - डेबी हॉक्ली, न्यूझीलंड १९८८
२००० धावा - डेबी हॉक्ली, न्यूझीलंड १९९५
३००० धावा - डेबी हॉक्ली, न्यूझीलंड १९९७
४००० धावा - डेबी हॉक्ली, न्यूझीलंड १९८८
५००० धावा - चार्लोड एडवर्ड्स, इंग्लंड, २०१५
६००० धावा - मिताली राज, भारत, २०१७
७००० धावा - मिताली राज, भारत, २०२१
टीम इंडियानं विजयासाठी ठेवलेलं ४ बाद २६६ धावांचे लक्ष्य आफ्रिकन संघानं ७ विकेट्स राखून सहज पार केलं. या विजयासह आफ्रिकेनं पाच सामन्यांच्या मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली. पण, या सामन्यात आफ्रिकेच्या ली ( ६९), ड्यू प्रीझ ( ६१), गुडबॉल ( ५९*) आणि वोलव्हार्ड ( ५३) यांनी अर्धशतक झळकावले. महिलांच्या वन डे क्रिकेटमध्ये एकाच सामन्यात एकाच संघातील चौघींनी अर्धशतक झळकावण्याची ही पहिलीच वेळ आहे.
मिताली राजचे विक्रम
दोन वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम ( २००५ व २००७) सामने खेळणारी पहिली भारतीय महिला कर्णधार आहे. वन डे क्रिकेटमध्ये तिनं सर्वाधिक ५४ अर्धशतकं झळकावली आहेत. इंग्लंडच्या चार्लोट एडवर्डच्या नावावर ४६ अर्धशतकं आहेत.
कसोटी क्रिकेटमध्ये द्विशतक झळकावणारी पहिली भारतीय आणि जगातील सातवी महिला खेळाडू आहे. २००२मध्ये तिनं इंग्लंडविरुद्ध २१४ धावा चोपल्या होत्या.
वन डे क्रिकेटमध्ये सलग सात अर्धशतकं झळकावणारी पहिली व एमकेम महिला खेळाडू. वयाच्या १६व्या वर्षी तिनं वन डे क्रिकेटमध्ये आयर्लंडविरुद्ध पदार्पण केलं. पहिल्याच सामन्यात शतक झळकावून तिनं पदार्पणात शंभर धावा चोपणाऱ्या युवा महिला खेळाडूचा मान पटकावला. अजूनही हा विक्रम तिच्याच नावावर आहे.
२० वर्षांहून अधिक काळ आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणारी पहिली महिला आणि २०० वन डे सामने खेळणारी एकमेव महिला क्रिकेटपटूचा मानही मिताली राजनं पटकावला आहे. मिताली राज ही ट्वेंटी-२० क्रिकेटमध्ये २००० धावा करणारी पहिली महिला खेळाडू आहे.
Web Title: 2 Games, 2 World Records : Mithali Raj becomes the first player to reach 7000 runs in Women's ODIs
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.