2 New IPL Teams in 2022, New Rules and Format : अहमदाबाद, लखनौ दोन नवीन संघ दाखल झाले अन् स्पर्धेचे नियम व स्वरूपही बदलले, जाणून घ्या अपडेट्स 

2 New IPL Teams in 2022, New Rules and Format : या दोन नव्या संघामुळे IPL 2022त मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, सनयारझर्स हैदराबाद, किंग्स पंजाब, लखनौ व अहमदाबाद असे दहा संघ खेळणार आहेत.  

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 08:00 PM2021-10-25T20:00:11+5:302021-10-25T20:00:55+5:30

whatsapp join usJoin us
2 New IPL Teams in 2022 : Ahmedabad and Lucknow to be the two new teams at Indian Premier League 2022, know about New Rules and Format | 2 New IPL Teams in 2022, New Rules and Format : अहमदाबाद, लखनौ दोन नवीन संघ दाखल झाले अन् स्पर्धेचे नियम व स्वरूपही बदलले, जाणून घ्या अपडेट्स 

2 New IPL Teams in 2022, New Rules and Format : अहमदाबाद, लखनौ दोन नवीन संघ दाखल झाले अन् स्पर्धेचे नियम व स्वरूपही बदलले, जाणून घ्या अपडेट्स 

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

2 New IPL Teams in 2022, New Rules and Format : संजीव गोएंका यांच्या RPSG Groupने लखनौ फ्रँचायझीसाठी सर्वाधिक ७ हजार कोटींची ( ९३२ मिलियन डॉलर) बोली लावली, तर खाजगी कंपनी CVC Capitals यांना Irelia म्हणूनही ओळखले जाते त्यांनी अहमदाबाद फ्रँचायझीसाठी ५२०० कोटी रुपये ( ६९२ मिलियन डॉलर) मोजले.  या दोन नव्या संघांमुळे बीसीसीआयला जवळपास १२ हजार कोटींची लॉटरी लागली आहे.

RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींची बोली लावली ( RPSG highest bid at INR 7000 CR.) संजीव गोएंका यांच्याकडे पुणे रायजिंग सुपरजायट्सं फ्रँचायझीचे मालकी हक्क होते आणि दोन वर्ष ( २०१६ व २०१७) त्यांचा संघ आयपीएलमध्ये खेळला होता. आता पुन्हा आयपीएलमध्ये एन्ट्री घेतल्यानं संजीव गोएंका आनंदी झाले आहेत. हे पहिलं पाऊल असून आता चांगला संघ तयार करण्याचं महत्त्वाचं काम करायचं आहे, अशी प्रतिक्रिया त्यांच्याकडून आली आहे.  संजीव गोएंका यांच्याकडे लखनौ फ्रँचायझीचे मालकी हक्क गेले आहेत.

CVC Capital यांनी या लिलावात दुसरी सर्वाधिक बोली लावून फ्रँचायझी नावावर केली. त्यांनी ५,१६६ कोटींची बोली लावली.  त्यामुळे अदानी ग्रुप व मँचेस्टर युनायटेडचा ग्रुप यांची फ्रँचायझी आयपीएल २०२२ त दिसणार नाही. ( No Adani and Machester United owners for IPL 2022.) CVC Capital ने अहमदाबाद फ्रँचायझीचे मालकी हक्क जिंकले. CVC Capital यांनी नुकतेच ला लिगा  क्लबमध्ये बोली जिंकली, त्यांच्याकडे फॉर्म्युला वन आणि रग्बी संघाचेही मालकी हक्क आहेत. 

या दोन नव्या संघामुळे IPL 2022त मुंबई इंडियन्स, चेन्नई सुपर किंग्स, रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स, सनयारझर्स हैदराबाद, किंग्स पंजाब, लखनौ व अहमदाबाद असे दहा संघ खेळणार आहेत.  

असे असतील नवे नियम ( IPL 2022 New Rules and Format)

  • २०११मध्ये १० संघ खेळले होते आणि तोच फॉरमॅट २०२२मध्येही असेल. 
  • दहा संघांनी दोन प्रत्येकी पाच-पाच अशा दोन गटांत विभागणी करण्यात येईल
  • गटातील प्रत्येक संघ एकमेकांशी दोन आणि दुसऱ्या गटातील संघाशी एक असे सामने खेळतील
  • साखळी फेरीत प्रत्येक संघ १४ सामने खेळतील. विजयी संघाला दोन गुण मिळतील, तर सामना अनिर्णीत राहिल्या दोन्ही संघांना प्रत्येकी १-१गुण दिला जाईल.

 

 प्ले ऑफचे चार सामने  

  • क्वालिफायर १ - साखळी फेरीत पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये
  • एलिमिनेटर - तिसऱ्या व चौथ्या क्रमांकावर असलेल्या संघांमध्ये
  • क्लालिफायर २ - क्वालिफायर १मधील पराभूत संघ विरुद्ध एलिमिनेटर मधील विजयी संघ
  • अंतिम सामना - क्वालिफायर १ विरुद्ध क्वालिफायर २ 
     

Web Title: 2 New IPL Teams in 2022 : Ahmedabad and Lucknow to be the two new teams at Indian Premier League 2022, know about New Rules and Format

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.