2 New IPL Teams in 2022 : Lalit Modi - संजीव गोएंका यांच्या RPSG Group आणि CVC Capital यांनी विक्रमी किमतीत अनुक्रमे लखनौ व अहमदाबाद फ्रँचायझी खरेदी केली. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ, तर CVC Capital यांनी ५,६०० कोटींत अहमदाबाद फ्रँचायझी नावावर केली. या नव्या करारानं बीसीसीआयला १२, ६९० कोटींचा फायदा झाला आहे. पण, आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदी ( Lalit Modi) नं नव्या फ्रँचायझीच्या ऑक्शनवरून बीसीसीआयवर गंभीर आरोप केले.
ललित मोदीनं ट्विट केलं की, बेटिंग कंपनीही आता आयपीएल संघ खरेदी करू शकतात, असे मला वाटतेय. कदाचित हा नवीन नियम असावा. आश्चर्याची गोष्ट म्हणजे दोन नव्या संघांच्या बोलीसाठीच्या कंपनीपैकी एका बिडरची मोठी बेटिंग कंपनी आहे. बीसीसीआयनं गृहपाठ केला नाही. अशा परिस्थिती अँटी करप्शन विभाग काय करणार?''
मोदीनं पुढे ट्विट केलं की, आताच आयपीएलच्या नव्या टीम मालकी हक्काबाबतचा नवीन पॉलिसी मला मिळाली. त्यानुसार बेटिंग कंपनी संघ खरेदी करू शकतो. त्यामुळे एक पात्र कंपनीची लंडनमध्ये मोठी बेटिंग कंपनी आहे.''
Web Title: 2 New IPL Teams in 2022 : Lalit Modi takes dig at BCCI, says even betting firms can buy IPL teams
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.