T20 World Cup 2024 - पुढल्या वर्षी होणाऱ्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेचे. अमेरिका आणि वेस्ट इंडिज यांना या स्पर्धेचे संयुक्त यजमानपद दिले गेले आहे. २० संघांचा सहभाग असलेला हा वर्ल्ड कप अनेक तगड्या संघांसाठी आव्हानात्मक ठरणार आहे. ३ ते ३० जून २०२४ या कालावधीत ५५ सामने खेळवले जाणार आहेत. या वर्ल्ड कप स्पर्धेसाठी आफ्रिका विभागातील पात्रता फेरी सुरू होती आणि त्यातून दोन संघ पात्र ठरले आहे. नामिबियाने दोन दिवसांपूर्वी पात्रता निश्चित केली होती, तर आज युगांडाने विजय मिळवून इतिहास घडवला. ते प्रथमच ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार आहेत. युगांडाच्या विजयाने झिम्बाब्वेला स्पर्धेबाहेर रहावे लागले.
युगांडाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यांच्या अल्पेश रामजानी ( २-१), दिनेश नाक्रानी ( २-१६), हेनरी सेन्योंदो ( २-१०) व ब्रायन मसाबा ( २-१०) यांनी उत्कृष्ट गोलंदाजी करून रवांडाचा संपूर्ण संघ १८.५ षटकांत ६५ धावांत तंबूत पाठवला. रवांडाकडून एरिक डुसिंगिजिमानाने १९ व मुहम्मद नादीरने ११ धावा केल्या. प्रत्युत्तरात रोनक पटेलने १८ धावा करून सलामीवीर सिमॉन सेसाझीसह ३१ धावांची सलामी दिली. त्यानंतर सेसाझी ( २६) व रॉजर मुसाका ( १३) यांनी युगांडाला विजय मिळवून दिला. युगांडाने ८.१ षटकांत १ बाद ६६ धावा करून विजय मिळवला. ( Uganda Cricket team has qualified for the T20 World Cup for the first time.)
पात्र ठरलेले २० संघ...अमेरिका, वेस्ट इंडिज, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, भारत, नेदरलँड्स, न्यूझीलंड, पाकिस्तान, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, अफगाणिस्तान, बांगलादेश, आयर्लंड, स्कॉटलंड, पापुआ न्यू गिनी, कॅनडा, नेपाळ, ओमान, नामिबिया, युगांडा
स्पर्धेचा फॉरमॅट...- २० संघ- प्रत्येकी ५ अशा चार गटांत विभागणी - चारही गटातील अव्वल दोन संघ सुपर ८ साठी पात्र- सुपर ८मध्ये ४-४ अशा दोन गटांत संघांची विभागणी - दोन्ही गटांतील प्रत्येकी अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत- फायनल