Join us  

सराव करताना बेशुद्ध झाल्याने 20 वर्षीय बॉक्सरने प्राण गमावला

राष्ट्रीय स्पर्धेत बंगालचे प्रतिनिधित्व केलेल्या 20 वर्षीय ज्योती प्रधान या बॉक्सरचे बुधवारी निधन झाले.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2019 1:22 PM

Open in App

कोलकाता : राष्ट्रीय स्पर्धेत बंगालचे प्रतिनिधित्व केलेल्या 20 वर्षीय ज्योती प्रधान या बॉक्सरचे बुधवारी निधन झाले. बेशुद्ध अवस्थेत तिला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले होते, परंतु डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वीच तिला मृत घोषित केले. तिला हृदय विकाराचा धक्का बसला होता. ती येथील पश्चिम बंगाल हौशी बॉक्सिंग महासंघात सराव करताना हा प्रसंग घडला. त्यामुळे महासंघाकडून या घटनेचा अहवाल मागवण्यात आला आहे.

येथे उपस्थित अन्य खेळाडूंच्या माहितीनुसार, ज्योतीनं रिंगमध्ये एका सहकारी खेळाडूसह सराव केला. त्यानंतर ती पंचिंग बॅगवर सराव करत होती. सायंकाळी 4.30च्या सुमारास अचानक तिला चक्कर आली. ट्रेनर्सही तिला शुद्धीत आणू शकले नाही आणि तिला त्वरित हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. हॉस्पिटलमध्ये पोहोचेपर्यंत ती श्वास सुरू होता. त्यानंतर तिला आपत्कालीन विभागात नेण्यात आले. पण, उपचार सुरू करण्यापूर्वीच तिला हृदय विकाराचा झटका आला आणि तिचे निधन झाले.

टॅग्स :बॉक्सिंग