आशिया चषक २०२३ साठी पाकिस्तानपाठोपाठ आता नेपाळने देखील आपला संघ जाहीर केला आहे. नेपाळने १७ सदस्यीय संघाची घोषणा केली असून २० वर्षीय खेळाडूच्या नेतृत्वात नेपाळचा संघ आशिया चषकासाठी सज्ज आहे. कर्णधार रोहित पौडेलने या वर्षाच्या सुरुवातीला ACC प्रीमियर चषक जिंकून नेपाळला २०२३ आशिया चषकासाठी पात्र होण्यास मदत केली. त्यामुळे २० वर्षीय खेळाडूला पुन्हा एकदा मोठ्या मंचावर देशाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ३० ऑगस्ट रोजी पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात स्पर्धेता सलामीचा सामना होणार आहे, तर ४ सप्टेंबरला नेपाळचा संघ भारताशी भिडेल.
आशिया चषकात नेपाळचा पहिला सामना मुल्तान येथे यजमान पाकिस्तानशी होणार आहे. नेपाळचा संघ या वर्षीच्या ICC पुरुष क्रिकेट विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नाही.
आशिया चषकासाठी नेपाळचा संघ -
रोहित पौडेल (कर्णधार), कुशल भुरटेल, आसिफ शेख, भीम शार्की, कुशल मल्ला, आरिफ शेख, दीपेंद्र सिंग आयरी, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी, प्रतिश जीसी, मौसोम ढकल, सुंदीप जोरा, किशोर महतो, अर्जुन सौद.
आशिया चषकाचे वेळापत्रक
३० ऑगस्ट - पाकिस्तान वि. नेपाळ, मुलतान
३१ ऑगस्ट - बांगलादेश वि. श्रीलंका, कँडी
२ सप्टेंबर - पाकिस्तान वि. भारत, कँडी
३ सप्टेंबर - बांगलादेश वि. अफगाणिस्तान, लाहोर
४ सप्टेंबर - भारत वि. नेपाळ, कँडी
५ सप्टेंबर - श्रीलंका वि. अफगाणिस्तान, लाहोर
६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर
९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी
१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी
१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला
१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला
१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला
१७ सप्टेंबर - फायनल
Web Title: 20 year old Rohit Paudel to lead Nepal at Asia Cup 2023, know here schedule
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.