आशिया चषक २०२३ साठी पाकिस्तानपाठोपाठ आता नेपाळने देखील आपला संघ जाहीर केला आहे. नेपाळने १७ सदस्यीय संघाची घोषणा केली असून २० वर्षीय खेळाडूच्या नेतृत्वात नेपाळचा संघ आशिया चषकासाठी सज्ज आहे. कर्णधार रोहित पौडेलने या वर्षाच्या सुरुवातीला ACC प्रीमियर चषक जिंकून नेपाळला २०२३ आशिया चषकासाठी पात्र होण्यास मदत केली. त्यामुळे २० वर्षीय खेळाडूला पुन्हा एकदा मोठ्या मंचावर देशाचे नेतृत्व करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ३० ऑगस्ट रोजी पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यात स्पर्धेता सलामीचा सामना होणार आहे, तर ४ सप्टेंबरला नेपाळचा संघ भारताशी भिडेल.
आशिया चषकात नेपाळचा पहिला सामना मुल्तान येथे यजमान पाकिस्तानशी होणार आहे. नेपाळचा संघ या वर्षीच्या ICC पुरुष क्रिकेट विश्वचषकासाठी पात्र ठरू शकला नाही.
आशिया चषकासाठी नेपाळचा संघ -रोहित पौडेल (कर्णधार), कुशल भुरटेल, आसिफ शेख, भीम शार्की, कुशल मल्ला, आरिफ शेख, दीपेंद्र सिंग आयरी, गुलशन झा, सोमपाल कामी, करण केसी, संदीप लामिछाने, ललित राजबंशी, प्रतिश जीसी, मौसोम ढकल, सुंदीप जोरा, किशोर महतो, अर्जुन सौद.
आशिया चषकाचे वेळापत्रक३० ऑगस्ट - पाकिस्तान वि. नेपाळ, मुलतान३१ ऑगस्ट - बांगलादेश वि. श्रीलंका, कँडी२ सप्टेंबर - पाकिस्तान वि. भारत, कँडी३ सप्टेंबर - बांगलादेश वि. अफगाणिस्तान, लाहोर४ सप्टेंबर - भारत वि. नेपाळ, कँडी५ सप्टेंबर - श्रीलंका वि. अफगाणिस्तान, लाहोर६ सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. B2, लाहोर९ सप्टेबंर ( सुपर ४) - B1 वि. B2, कँडी१० सप्टेंबर ( सुपर ४) - A1 वि. A2, कँडी१२ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A2 वि. B1, दाम्बुला१४ सप्टेंबर ( सुपर ४ ) - A1 वि. B1, दाम्बुला१५ सप्टेंबर ( सुपर ४) - A2 वि. B2, दाम्बुला१७ सप्टेंबर - फायनल