Sourav Ganguly: IPL 2023 साठी दिल्ली कॅपिटल्सने अनेक मोठे बदल केले आहेत. सर्वात मोठा बदल फक्त कर्णधारदात झाला आहे. दिल्लीचा नियमित कर्णधार रिषभ पंत (Rishabh Pant) दुखापतीमुळे या मोसमात खेळणार नाही. त्याच्या जागी डेव्हिड वॉर्नर संघाची धुरा सांभाळणार आहे. यासोबतच अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदही सोपवण्यात आले आहे. यासह आणखी एक मोठे नाव दिल्ली कॅपिटल्सशी जोडले गेले आहे. हे नाव आहे सौरव गांगुली. त्याची दिल्ली कॅपिटल्सने टीम डायरेक्टर म्हणून नियुक्ती केली आहे. त्यामुळे एक असा योगायोग जुळून आला आहे की, २० वर्षांपूर्वी ज्या खेळाडूशी दोन हात करून गांगुली विश्वचषक विजयाचे स्वप्न पाहत होता, त्याच्यासोबत खांद्याला खांदा लावून त्याला दिल्लीला विजय मिळवून द्यायचा आहे.
दिल्ली कॅपिटल्स व्यवस्थापनाने गुरुवारी जाहीर केले की सौरव गांगुली त्यांच्याकडे क्रिकेट संचालक म्हणून सामील होईल. आम्ही तुम्हाला सांगतो की हा अनुभवी खेळाडू 2019 मध्ये दिल्ली संघाशी देखील जोडला गेला होता आणि टीम प्लेऑफमध्ये पोहोचली होती. सौरव गांगुलीची भूमिका दिल्ली कॅपिटल्सचे मार्गदर्शन अशी असणार आहे. तसे, दिल्लीकडे रिकी पाँटिंगच्या रूपाने जागतिक दर्जाचा प्रशिक्षकही आहे. त्यामुळे पॉन्टींग-गांगुलीच्या पाठिंब्याने हा संघ रणनीतिदृष्ट्या मजबूत होणार आहे.
अजब योगायोग! एकेकाळचे 'पक्के वैरी' आता एकत्र
सौरव गांगुली आणि रिकी पाँटिंगला एकत्र काम करताना पाहणे विशेष असेल. कारण पाँटिंग हा एकमेव कर्णधार आहे, ज्याच्या टीमने सौरव गांगुलीचे स्वप्न धूळीस मिळवलं होतं. २००३ च्या विश्वचषकाच्या फायनलमध्ये भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ आमनेसामने होते, पण गांगुलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला फायनलमध्ये पराभव पत्करावा लागला होता. आता दिल्लीचा संघ ४ मार्चला गुजरात टायटन्सविरुद्ध आपल्या मोहिमेची सुरुवात करणार आहे. गेल्या मोसमात हा संघ प्ले ऑफमध्ये पोहोचू शकला नव्हता. हा संघ गुणतालिकेत पाचव्या क्रमांकावर होता. पण २०१९ मधील गांगुलीच्या मार्गदर्शनाखालील कामगिरी पाहता, यंदा हा संघ कमाल करू शकतो असे बोलले जात आहे.
Web Title: 20 years ago the one who crushed Sourav Ganguly dream will now fight together for Delhi Capitals in IPL 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.