विश्वचषक स्पर्धेत भारताने आपले स्थान पक्क केल्यानंतर आजच्य सेमी फायनलमध्ये द. आफ्रिक आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात रोमांचक लढत झाली. आजपर्यंतच्या परंपरेप्रमाणे द. आफ्रिकेचा पराभव झाल्याने आफ्रिकन क्रिकेट चाहत्यांचा अपेक्षाभंग झाला. ऑस्ट्रेलियाने आफ्रिकेचा पराभव करत फायनलचे तिकीट गाठले. त्यामुळे, आता अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात अंतिम लढत होणार आहे. त्यामुळे, ट्विटवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया आणि पॉन्टींग हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात २००३ साली विश्वचषक स्पर्धेत लढत झाली होती. कर्णधार सौरव गांगुलीच्या नेतृत्वात भारताने हा सामना खेळला होता. त्यावेळी, रिकी पॉन्टींगच्या तुफानी फलंदाजीमुळे ऑस्ट्रेलियन संघ मजबूत स्थितीत पोहोचला होता. ऑस्ट्रेलियाने ३५९ धावा केल्या होत्या. त्यात, रिकी पॉन्टींगने नाबाद १४० धावांची खेळी केली होती. त्यामुळे, भारतीय संघ मोठ्या दबावातच फलंदाजीला सामोरे गेला. टीम इंडियाला या सामन्यात २३४ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे, भारताचा १२५ धावांनी पराभव झाला होता. त्यामुळे, २० वर्षांपूर्वीच्या पराभवाची जखम आता पुन्हा एकदा ताजी झाली आहे.
रोहित शर्माच्या कर्णधार नेतृत्त्वात टीम इंडिया कमालीची फॉर्मात आहे. त्यामुळे, रविवारचा अंतिम सामना भारतच जिंकेल, असा विश्वास कोट्यवधी भारतीयांना आहे. २० वर्षांपूर्वीच्या जखमेवर आता २० वर्षानंतर मलम लावला जाईल, यावेळी ती जखम भरुन येईल, भारत ऑस्ट्रेलियावर विजयी वार करेल, असे सर्वच भारतीयांना वाटते. त्यामुळेच, ट्विटरवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया हा हॅशटॅग ट्रेंड होत आहे. तर, तत्कालीन कर्णधार रिकी पॉन्टींगचीही आठवण नेटीझन्सला येत आहे. सौरव गांगुली आणि रिकी पॉन्टींगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.