२७ चेंडूंत ११४ धावा! डोंबिवलीच्या सानिका चाळकेचे विक्रमी द्विशतक, स्मृती मानधनाच्या क्लबमध्ये पटकावले स्थान

Women's U19 One Day Tournament - १९ वर्षांखालील मुलींच्या वन डे क्रिकेट स्पर्धेत डोंबिवलीच्या सानिका चाळकेने ( Sanika Chalke ) बुधवारी विक्रमी द्विशतक झळकावले.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2022 01:45 PM2022-12-14T13:45:58+5:302022-12-14T13:46:30+5:30

whatsapp join usJoin us
200 runs in 117 balls, with 24 fours and 3 sixes: Mumbai's Sanika Chalke joins the elite list with s mandhana, j rodrigues and raghvi bist after scoring Double-Century in the Women's U19 One Day Tournament  | २७ चेंडूंत ११४ धावा! डोंबिवलीच्या सानिका चाळकेचे विक्रमी द्विशतक, स्मृती मानधनाच्या क्लबमध्ये पटकावले स्थान

२७ चेंडूंत ११४ धावा! डोंबिवलीच्या सानिका चाळकेचे विक्रमी द्विशतक, स्मृती मानधनाच्या क्लबमध्ये पटकावले स्थान

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Women's U19 One Day Tournament - १९ वर्षांखालील मुलींच्या वन डे क्रिकेट स्पर्धेत डोंबिवलीच्या सानिका चाळकेने ( Sanika Chalke ) बुधवारी विक्रमी द्विशतक झळकावले. मुंबईचे प्रतिनिधित्व करणार्या सानिकाने द्विशतकी खेळी करताना स्मृती मानधना, जेमिमा रॉड्रीग्ज आणि राघवी बिस्त यांच्या क्लबमध्ये स्थान पटकावले. सानिकाच्या द्विशतकाच्या जोरावर मुंबईने ४ बाद ४५५ धावांचा डोंगर उभे केले आणि सिक्किमची हालत खराब केली.

प्रथम फलंदाजीला आलेल्या मुंबईसाठी सलोनी कुस्ते ( ३१) व अलिना मुल्ला ( ३२) यांनी ठिकठाक सुरुवात करून दिली. कर्णधार तुषी शाह ( १५) लगेच माघारी परतल्याने मुंबईची अवस्था ३ बाद ९८ अशी झाली होती. सानिका चाळके व शार्वी सावे यांनी दमदार फटकेबाजी केली. सानिकाने ११७ चेंडूंत नाबाद २०० धावा केल्या. तिच्या या खेळीत २४ चौकार व ३ षटकारानेच २७ चेंडूंत ११४ धावा आल्या. शार्वीनेही ७९ चेंडूंत १२ चौकार व २ षटकारासह नाबाद १११ धावा करताना संघाला ४ बाद ४५५ धावांचा टप्पा गाठून दिला. प्रत्युत्तरात सिक्कीमने ३ धावांत १ विकेट गमावली आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

Web Title: 200 runs in 117 balls, with 24 fours and 3 sixes: Mumbai's Sanika Chalke joins the elite list with s mandhana, j rodrigues and raghvi bist after scoring Double-Century in the Women's U19 One Day Tournament 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.