कोलकाता : भारत वर्ल्ड कप 2019 मध्ये आपल्या अभियानाची सुरुवात 5 जूनपासून दक्षिण आफ्रिकेतून करणार आहे. बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिका-यांनी मंगळवारी ही माहिती दिली. वर्ल्ड कप 2019 मध्ये इंग्लंडमध्ये 30 मे ते 14 जुलै दरम्यान खेळला जाणार आणि भारत आपल्या अभियानाला 5 जूनपासून सुरुवात करणार आहे.
कधी असणार भारत-पाकिस्तान सामना?
भारतात आपल्या वर्ल्डकप अभियानाची सुरुवात दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्याने करणार आहे. तर भारत-पाकिस्तान सामना 16 जूनला होणार आहे. हा सामना मॅंचेस्टरला खेळला जाणार आहे. भारताने नेहमीच पाकिस्तानला मात दिली आहे. आणखी काय बदल
बीसीसीआयच्या एका वरिष्ठ अधिका-याने नाव न सांगण्याच्या अटीवर माहिती दिली की, ‘पुढील वर्षी २९ मार्च ते १९ मे दरम्यान आयपीएल रंगेल, परंतु आम्हाला आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी किमान १५ दिवसांचे अंतर ठेवावे लागेल आणि विश्वचषक स्पर्धा ३० मेपासून सुरु होईल. त्यामुळे १५ दिवसांचे अंतर ठेवण्यासाठी आम्ही ४ जूनपासून सामने खेळू शकतो.’
दखल घेण्याची बाब म्हणजे याआधी स्टेडियम खचाखच भरावे यासाठी आयासीसीच्या मुख्य स्पर्धांची सुरुवात भारत वि. पाकिस्तान या हायव्होल्टेज सामन्याने केली जायची. २०१५ साली झालेला विश्वचषक (अॅडलेड) आणि २०१७ सालची चॅम्पियन्स ट्रॉफी (बर्मिंघहॅम) या स्पर्धेतही याच सामन्याने सुरुवात झाली होती. ‘राऊंड रॉबिन पद्धतीने होणाºया या स्पर्धेत पहिल्यांदाच भारत - पाकिस्तान सामन्याने सुरुवात होणार नाही,’ असेही बीसीसीआय अधिका-याने म्हटले.