Join us  

2019 मध्ये भारतीयांनी गुगलवर या गोष्टीबाबत केले सर्वाधिक सर्च

सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलने सरत्या वर्षात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च झालेल्या किवर्ड्सची यादी प्रसिद्ध केली आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 2:10 PM

Open in App

नवी दिल्ली - सरते वर्ष भारतीयांच्या दृष्टीने अनेक घटनांनी भरलेले राहिले. पुलवामा हल्ला आणि त्यानंतरची एअर स्ट्राइक, लोकसभा निवडणूक,  क्रिकेट विश्वचषकातील भारतीय संघाची कामगिरी, चांद्रयान-2 मोहिम, कलम 370 या घटना देशवासियांच्या मनात ठळकपणे नोंदवल्या गेल्या. मात्र या सर्वांमधून इंटरनेटवर भारतीयांची सर्वाधिक पसंती मिळाली ती क्रिकेटला. सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलने सरत्या वर्षात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च झालेल्या गोष्टींची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये भारतीयांना या वर्षात Cricket World Cup बाबत सर्वाधिक सर्च केले. त्यामुळेच गुगलच्या ओव्हरऑल कॅटॅगरीमध्ये या सर्चला पहिले स्थान मिळाले आहे. गुगलच्या यावर्षी सर्वाधिक सर्च झालेल्या गोष्टींवर नजर टाकल्यास सर्चच्या ओव्हरऑल कॅटॅगरीमध्ये क्रिकेट वर्ल्ड कप अव्वल स्थानी राहिला. तर लोकसभा निवडणूक हा शब्द सर्वाधिक सर्च करण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानी राहिला. त्याशिवाय चांद्रयान-2, आर्टिकल 370 याबाबतही मोठ्या प्रमाणात सर्च केले गेले. कबीर सिंग, अॅव्हेंजर्स एण्डगेम या चित्रपटांबाबतही भारतीयांनी गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च केले.  सर्वाधिक सर्च झालेल्या बाबींची गुगलची ओव्हरऑल यादी 1) क्रिकेट वर्ल्ड कप (Cricket World Cup) 2) लोकसभा निवडणूक ( Lok Sabha Elections) 3) चांद्रयान-2 ( Chandrayaan 2) 4) कबीर सिंग (Kabir Singh)5) अॅव्हेंजर्स एण्डगेम ( Avengers: Endgame)6) आर्टिकल 370 ( Article 370)7) नीट एक्झॅम ( NEET results)8) जोकर ( Joker)9) कॅप्टन मार्व्हल ( Captain Marvel )10) पीएम किसान योजना ( PM Kisan Yojana) 

टॅग्स :गुगलभारतइंटरनेट