Join us  

धो डाला; ट्वेंटी-20त इंग्लंडच्या 22 वर्षीय फलंदाजाचं खणखणीत शतक!

कॅरेबियन प्रीमिअर लीगनंतर ( सीपीएल) आजपासून आणखी एका ट्वेंटी-20 लीगला सुरुवात झाली.

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2020 8:21 PM

Open in App

कॅरेबियन प्रीमिअर लीगनंतर ( सीपीएल) आजपासून आणखी एका ट्वेंटी-20 लीगला सुरुवात झाली. व्हीटॅलिटी ब्लास्ट असं नाव असलेल्या या लीगमध्ये इंग्लंडच्या 22 वर्षीय खेळाडूनं पहिल्याच सामन्यात नाबाद शतकी खेळी केली. मिडलेसेक्स क्लबच्या 22वर्षीय मॅक्स होल्डन यानं एसेक्स क्लबविरुद्धच्या सामन्यात तुफान फटकेबाजी केली. त्याच्या नाबाद शतकाच्या जोरावर संघानं 5 बाद 184 धावांचा डोंगर उभा केला.

विराट-अनुष्काच्या गोड बातमीवर बीसीसीआय, आयसीसीच्या हटके शुभेच्छा

विराट-अनुष्का बनणार आई-बाबा; इंग्लंडच्या जोफ्रा आर्चरचं ट्विट होतंय व्हायरल, पण का?

कुछ मिठा खाना हो, तो 'शर्मा'ना मत! विराट-अनुष्काच्या गूड न्यूजवर 'झोमॅटो'चं भन्नाट ट्विट 

स्टीव्हन इस्कीनाजी ( 24) आणि होल्डन यांनी मिडलेसेक्स क्लबसाठी सुरुवात केली. पण, स्टीव्हन तिसऱ्याच षटकात माघारी परतला. त्यानंतर मार्टीन अँडरसन ( 5) धावबाद झाला. निक गुबीन ( 23) आणि डॅन लिकोईन ( 11) यांनी होल्डनला साथ देण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांना मोठ्या खेळीत रुपांतर करता आले नाही. पण, होल्डन एका बाजूनं खिंड लढवत होता. त्यानं 60 चेंडूंत 9 चौकार व 3 षटकार खेचून 170च्या स्ट्राईक रेटनं नाबाद 102 धावा कुटल्या.

अन्य महत्त्वाच्या बातम्या

IPL 2020 : दिल्ली कॅपिटल्सची अन्य संघांनी घेतली धास्ती; बिग बॅश लीग गाजवणारा गोलंदाज ताफ्यात दाखल   

IPL 2020 : मुंबई इंडियन्स अन् KKR ला झटका; खेळाडूंना 7 नव्हे तर 14 दिवसांसाठी व्हावे लागले क्वारंटाईन

'विरुष्का'नं दिली गोड बातमी अन् इथे नेटिझन्सनी लगावला मीम्सचा मास्टर स्ट्रोक!  

IPL 2020 Schedule Update : दोन लेगमध्ये होणार आयपीएलचे सामने; जाणून घ्या कसं असेल वेळापत्रक!

टॅग्स :टी-20 क्रिकेटइंग्लंड