हा वर्ल्ड कप शेवटचा! २४व्या वर्षी आंतरराष्ट्रीय गोलंदाजाची निवृत्ती, विराटशी झालेला पंगा

ICC Men's Cricket World Cup - नवीन उल हकने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात पोहोचताच निवृत्ती जाहीर केली.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 28, 2023 08:43 AM2023-09-28T08:43:59+5:302023-09-28T08:45:46+5:30

whatsapp join usJoin us
24-year-old Afghanistan youngster Naveen ul Haq set for shock ODI retirement at conclusion of ICC Men's Cricket World Cup | हा वर्ल्ड कप शेवटचा! २४व्या वर्षी आंतरराष्ट्रीय गोलंदाजाची निवृत्ती, विराटशी झालेला पंगा

हा वर्ल्ड कप शेवटचा! २४व्या वर्षी आंतरराष्ट्रीय गोलंदाजाची निवृत्ती, विराटशी झालेला पंगा

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

ICC Men's Cricket World Cup - नवीन उल हकने वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतात पोहोचताच निवृत्ती जाहीर केली. अफगाणिस्तानचा संघ काल भारतात पोहोचला आणि बुधवारी नवीनने सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा करून सर्वांना चकित केले. नवीनने वयाच्या २४ व्या वर्षी वन डे क्रिकेटला अलविदा करण्याचा निर्णय घेतला. अफगाणिस्तानच्या गोलंदाजाने इंस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत आपला निर्णय स्पष्ट केला. त्याने लिहिले की, देशासाठी खेळणे हा सन्मान आहे. मी वन डे क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा करत आहे आणि वर्ल्ड कप संपताच मी या फॉरमॅटला अलविदा करेन. अफगाणिस्तानसाठी ट्वेंटी-२० फॉरमॅट खेळत राहणार आहे. 


नवीन म्हणाला की, ''निवृत्तीचा निर्णय घेणे त्याच्यासाठी सोपे नव्हते, पण आपली कारकीर्द प्रदीर्ध करण्यासाठी हा कठीण निर्णय घ्यावा लागला. अफगाणिस्तान क्रिकेटला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांचे आभार.'' त्याच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने २०१६ मध्ये वन डे क्रिकेटमध्ये पदार्पण केले आणि जानेवारी २०२१मध्ये शेवटचा  वन डे सामना खेळला होता. त्याने अफगाणिस्तानसाठी ७ वन डे सामन्यात १४ बळी घेतले. मार्च २०२३ मध्ये तो अफगाणिस्तानसाठी शेवटचा ट्वेंटी-२० सामनाही खेळला होता. आशिया चषकासाठीही नवीनची संघात निवड झाली नव्हती.



काही महिन्यांपूर्वी तो आयपीएल खेळण्यासाठी भारतात आला होता. आयपीएलदरम्यान त्याने विराट कोहलीसोबत भांडणही केले होते. वास्तविक, मे महिन्याच्या सुरुवातीला लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना झाला होता. नवीन लखनौच्या वतीने मैदानात उतरला होता. यादरम्यान त्याची मैदानावर कोहलीसोबत झटापट झाली. सामना संपल्यानंतर वातावरण बिघडले. लखनौचे मार्गदर्शक गौतम गंभीर यांनीही मध्यस्थी केली. मैदानावर प्रकरण शांत झाले, पण नवीन शांत झाला नाही. त्याने नाव न घेता सोशल मीडियावर निशाणा साधण्यास सुरुवात केली.

Web Title: 24-year-old Afghanistan youngster Naveen ul Haq set for shock ODI retirement at conclusion of ICC Men's Cricket World Cup

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.