संपूर्ण जग जीवघेण्या कोरोना व्हायरसशी दोन-दोन हात करत आहे. या व्हायरसमुळे लोकांना घरात बंदिस्त रहावे लागत आहे. सरकार, सामाजिक संस्था आणि सेलिब्रेटी मदतीसाठी पुढे सरसावले आहेत. श्रीलंकनं क्रिकेट मंडळानं त्यांच्या सरकारला कोट्यवधींची मदत केली, शाहिद आफ्रिदी पाकिस्तानातील 200 गरजुंना अन्न पुरवत आहे, सानिया मिर्झानेही रोजंदारी कामगारांसाठी अन्न पुरवण्याची चळवळ उभी केली आहे. आता बांगलादेशच्या 27 क्रिकेटपटूंनी त्यांच्या पगाराची निम्मी रक्कम बांगलादेश सरकारला कोरोना व्हायरसशी मुकाबला करण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे.
ढाका ट्रिबूनच्या माहितीनुसार 27 खेळाडूंपैकी 17 खेळाडू राष्ट्रीय करारात आहेत, तर उर्वरित 10 खेळाडूंनी नुकतेच झिम्बाब्वेविरुद्धच्या मालिकेत सहभाग घेतला होता. या खेळाडूंच्या पगाराची रक्कम मिळून 23.25 लाखांचा निधी बांगलादेश सरकारला देणार आहे. बांगलादेश क्रिकेटपटू तमीम इक्बालने फेसबूकवर पोस्ट करून ही माहिती दिली आहे.
तो पुढे म्हणाला,''ही रक्कम कोरोना व्हायरसचा मुकाबला करण्यासाठी कदाचीत कमी पडेल, परंतु आपण सर्वांनी एकत्र येऊन मदत केल्यात परिस्थिती बदलता येऊ शकते. आपण सर्व एकत्र आलो, तर कोरोना विरुद्धचे हे युद्ध आपण नक्की जिंकू. कृपया करून घरीच थांबा, सुरक्षित राहा.''
कोरोना व्हायरसमुळे जगभरातील मृतांचा आकडा जवळपास 19 हजारांपर्यंत पोहोचला आहे. बांगलादेशमध्ये 39 जण मृत्यूमुखी पडली आहेत. बांगलदेशमध्ये 26 मार्च ते 4 एप्रिल या कालावधीपर्यंत अंतर्गत विमानसेवा, सार्वजनिक वाहतुक आणि ट्रेन बंद केल्या गेल्या आहेत.
अन्य महत्त्वाच्या बातम्या
लिओनेल मेस्सी अन् ख्रिस्तियानो रोनाल्डो यांंचा मदतीचा हात; सार्वजनिक हॉस्पिटलला कोट्यवधींची मदत
सानिया मिर्झाची समाजोपयोगी चळवळ; रोजंदारी कामगारांचे पोट भरण्याचा निर्धार
संपूर्ण देश लॉकडाऊन; आर अश्विननं जनतेला करून दिली 'त्या' प्रसंगाची आठवण
Video : शिखर धवन बनला धोबी... सायना नेहवालसह डेव्हिड वॉर्नर, मोहम्मद नबीकडून सांत्वन
पंतप्रधान मोदींच्या 'त्या' घोषणेनं IPL 2020च्या आशा मावळल्या? BCCIचं महत्त्वपूर्ण विधान
वा दादा... सरकारसाठी खुलं करणार इडन गार्डन मैदान; क्वारंटाईन लोकांच्या मदतीसाठी पुढाकार
हरभजन सिंगनं केलं शाहिद आफ्रिदीचं कौतुक; कारण जाणून तुम्हीही ठोकाल कडक सॅल्यूट