१८८८ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट आपल्या पायावर उभं राहण्यास शिकत होतं. याच दरम्यान इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ॲशेस कसोटी मालिकेचा सामना लंडनच्या लॉर्ड्स मैदानावर खेळवण्यात आला. त्या काळात या दोन संघामध्येच कडवा संघर्ष पाहायला मिळायचा.
१८८८च्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा संघ इंग्लंड दौऱ्यावर गेला होता. तीन कसोटी सामन्यांच्या मालिकेला लॉर्ड्स मैदानावरून सुरुवात झाली. १६ जुलैला सुरू झालेली ही कसोटी १७ जुलैला संपली होती. त्याकाळी कसोटी सामना ६ दिवसांचा असायचा. त्यात एका दिवसाचा आराम असायचा.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यजमान इंग्लंडने त्यांचा डाव ११६ धावांत गुंडाळला. त्यानंतर इंग्लंडचे तीन विकेट्स पडल्या. १७ जुलैला दुसऱ्या दिवशी इंग्लंडचा संपूर्ण संघ ५३ धावांत माघारी पाठवून ऑस्ट्रेलियाने ६३ धावांची आघाडी घेतली.
६३ धावांच्या आघाडीनंतर ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव ६० धावांत गडगडला. १२४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग सहज करेल असे वाटले होते. पण इंग्लंडचा दुसरा डाव ६२ धावांत गुंडाळून ऑस्ट्रेलियाने ६१ धावांनी सामना जिंकला.
१७ जुलै १८८८ मध्ये एकाच दिवशी २७ विकेट्स पडल्या. यात इंग्लंडच्या १७ आणि ऑस्ट्रेलियाच्या १० विकेट्सचा समावेश होता. सामन्याच्या दुसऱ्या दिवशी १५७ धावा झा
ल्या आणि २७ विकेट्स पडल्या. १३२ वर्षांनंतरही हा विक्रम अबाधित आहे. १९०२ मध्ये ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात मेलबर्नवर झालेल्या सामन्यात एकाच दिवशी २५ विकेट्स पडल्या होत्या.