हे हेडिंग वाचून तुम्ही नक्कीच गांगरले असाल. एका चेंडूत 286 धावा, कशा काय निघू शकतात, हा विचार तुम्ही करत असाल. या बातमीत काही तरी खोटं-नाटं असेल, असा विचार आता तुमच्या मनातही आलं असेल. पण तसं नाही. कारण ही गोष्ट घडली आहे. तीदेखील क्रिकेटच्या मैदानात.
ही गोष्ट आत्ताच्या घडीची नाही, हे आम्ही स्पष्ट करतो. ही गोष्ट ऑस्ट्रेलियामध्ये घडली होती. दिवस होता 15 जानेवारी 1894. सामना होता व्हिक्टोरीया आणि स्क्रैच XI’ या दोन संघांमध्ये. या सामन्याच्या पहिल्याच चेंडूवर फलंदाजाने मोठा फटका मारला. त्यावेळी चेंडू एका झाडावर अडकला. चेंडू अडकल्यानंतर दोन्ही फलंदाज धावतच राहीले. हे दोन्ही फलंदाज जवळपास सहा किलोमीटर एवढे अंतर पळाले आणि त्यांनी 286 धावा काढल्या. फलंदाज जेव्हा धावा घेत होते, तेव्हा गोलंदाजी करत असलेल्या संघाकडे अपील केली की, चेंडू हरवला आहे, हे तुम्ही घोषित करा. जर पंचांनी चेंडू हरवल्याचे घोषित केले असते तर फलंदाजांना धावा काढत्या आल्या नसत्या. पण पंचांनी यावेळी सांगितले की, चेंडू हरवलेला नसून तो झाडावर अडकलेला दिसतो आहे. त्यामुळे चेंडू हरवल्याचे घोषित करता येणार नाही.
झाडावरून चेंडू कसा काढला...
गोलंदाजी करत असलेल्या संघाने झाडावरून चेंडू काढण्यासाठी बरेच प्रयत्न केले. संघातील एक खेळाडूने तर चक्क कुऱ्हाड मागवली. पण त्यांना कुऱ्हाड काही मिळाली नाही. त्यानंतर एका खेळाडूने चक्क रायफल मागवली. या रायफलने चेंडूवर निशाणा लावला आणि चेंडू झाडावरून खाली पाडण्यात आला.
झाडावरून चेंडू खाली पडल्यावर गोलंदाजी करणारा संघ जाम खूष झाला आणि त्यांनी जोरदार सेलिब्रेशन केलं. पण जर झालावरून खाली पडणारा चेंडू जर त्यांनी झेलला असता तर फलंदाज बाद झाला असता आणि एकही धाव फलंदाजी करणाऱ्या संघाला मिळाली नसती. पण गोलंदाजी करणारा संघ सेलिब्रेशन करत राहिला आणि त्यांनी तब्बल 286 धावा गमावल्या.
Web Title: 286 runs off a one ball; The batsmen ran six kilometers
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.