दुबई : पुढील दहा वर्षांत आयसीसीच्या २९ स्पर्धांचे आयोजन होईल. आयसीसीने जाहीर केलेल्या एफटीपीनुसार २०२४ ते २०३१ या कालावधीत पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी ८-८ स्पर्धांचे आयोजन होईल. २०२७ च्या वन डे विश्वचषकात १४ संघांचा समावेश असेल. २००३ नंतर प्रथमच सुपर सिक्स फाॅर्मेटमध्ये सामने खेळविले जातील.२०१८ ला रद्द झालेली चॅम्पियन्स ट्रॉफी पुन्हा सुरू होणार असून, आघाडीचे आठ संघ स्पर्धेत सहभागी होतील. २००५ आणि २०२९ ला ही स्पर्धा होईल. टी-२० विश्वचषकासाठी सहभागी संघांची संख्या २० करण्यात आली आहे. यंदा भारतात टी-२० विश्वचषक आयोजित होत असून, २०२२ चा विश्वचषक ऑस्ट्रेलियात होणार आहे.भारत-पाकिस्तान सामने दरवर्षी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना क्रिकेट चाहत्यांसाठी पर्वणी असते. दोन्ही संघ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये एकमेकांविरुद्ध खेळतात. आयसीसीच्या भविष्यकालीन दौरा कार्यक्रमानुसार २०२४ ते २०३१ अशा कालावधीतील दरवर्षी टी-२० विश्वचषक, वन डे विश्वचषक, चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत-पाकिस्तान सामने खेळले जातील. यंदाच्या टी-२० विश्वचषकापासून उभय संघांत सामना पाहायला मिळणार आहे.महिला एफटीपी वेळापत्रकवर्ष स्पर्धा संघ सामने२०२४ टी-२० विश्वचषक १० २३२०२५ वन डे विश्वचषक ८ ३१२०२६ टी-२० विश्वचषक १२ ३३२०२७ चॅम्पियन्स ट्रॉफी ६ १६२०२८ टी-२० विश्वचषक १२ ३३२०२९ वन डे विश्वचषक १० ४८२०३० टी-२० विश्वचषक १२ ३३२०३१ चॅम्पियन्स ट्रॉफी ६ १६पुरुष एफटीपी वेळापत्रकवर्ष स्पर्धा संघ सामने२०२४ टी-२० विश्वचषक २० ५५२०२५ चॅम्पियन्स ट्रॉफी ८ १५२०२५ डब्ल्यूटीसी फायनल २ १२०२६ टी-२० विश्वचषक २० ५५२०२७ वन डे विश्वचषक १४ ५४२०२७ डब्ल्यूटीसी फायनल २ १२०२९ टी-२० विश्वचषक २० ५५२०२९ चॅम्पियन्स ट्रॉफी ८ १५२०२९ डब्ल्यूटीसी फायनल २ १२०३० टी-२० विश्वचषक २० ५५२०३१ वन डे विश्वचषक १४ ५४२०३१ डब्ल्यूटीसी फायनल २ १
- Cricket Buzz»
- बातम्या»
- पुढील दहा वर्षात २९ आयसीसी स्पर्धांचे आयोजन; २०२७ च्या विश्वचषकात १४ संघांचा सहभाग
पुढील दहा वर्षात २९ आयसीसी स्पर्धांचे आयोजन; २०२७ च्या विश्वचषकात १४ संघांचा सहभाग
आयसीसीने जाहीर केलेल्या एफटीपीनुसार २०२४ ते २०३१ या कालावधीत पुरुष आणि महिला गटात प्रत्येकी ८-८ स्पर्धांचे आयोजन होईल. २०२७ च्या वन डे विश्वचषकात १४ संघांचा समावेश असेल.
By ऑनलाइन लोकमत | Published: June 03, 2021 7:04 AM