Join us  

PAK vs ZIM, 1st ODI : झिम्बाब्वेवर विजयासाठी पाकिस्तानला गाळावा लागला घाम; भारताच्या विक्रमाशी शेजाऱ्यांची बरोबरी

पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातला पहिला वन डे आजपासून सुरू झाला. पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २८१ धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेकडून कडवी टक्कर मिळाली.

By स्वदेश घाणेकर | Published: October 30, 2020 8:46 PM

Open in App

पाकिस्तान विरुद्ध झिम्बाब्वे यांच्यातला पहिला वन डे आजपासून सुरू झाला. पाकिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना ८ बाद २८१ धावा केल्या. प्रत्युत्तरात झिम्बाब्वेकडून कडवी टक्कर मिळाली. अखेरच्या चार षटकांत विकेट गमावल्यानं झिम्बाब्वेला धक्कादायक निकाल नोंदवता आला नाही. ब्रेंडन टेलरचे खणखणीत शतक आणि वेस्ली मॅधेव्हेर याच्या अर्धशतकाच्या जोरावर झिम्बाब्वेनं यजमानांना विजयासाठी घाम गाळायला लावला. पण, अखेरीस पाकिस्तानला २६ धावांनी हा सामना जिंकण्यात यश आलं.  पाकिस्ताननं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. इमाम-उल-हक आणि अबीद अली यांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली. पण, ४७ धावांवर असताना अली ( २१) माघारी परतला. कर्णधार बाबर आझम ( १९) यालाही मोठी खेळी करता आली नाही. इमाम-उल-हक चांगल्या फॉर्मात दिसत होता, त्यानं अर्धशतकही झळकावलं. इमाम-उल-हक ७५ चेंडूंत ६ चौकारांच्या मदतीनं ५८ धावांवर धावबाद झाला. त्यानंतर सोहेलनं अर्धशतकी खेळी केली. त्यानं ८२ चेंडूंत ६ चौकार व २ षटकारांसह ७१ धावा केल्या. पाकिस्तानचे अन्य फलंदाज टप्प्याटप्यानं माघारी परतल्यानं त्यांना ५० षटकांत ८ बाद २८१ धावा करता आल्या आहेत. इमाद वासीमनं ३४ धावांची नाबाद खेळी केली. लक्ष्याचा पाठलाग करताना क्रेग एरव्हिन ( ४१) व मॅधेव्हेर ( ५५) यांनी चांगली खेळी करताना शतकवीर टेलरला उत्तम साथ दिली. टेलरनं ११६ चेंडूंत ११ चौकार व ३ षटकारांसह ११२ धावा केल्या. झिम्बाब्वेचा संपूर्ण संघ २५५ धावांत माघारी परतला. भारताच्या विक्रमाशी बरोबरीवन डे क्रिकेटच्या एका डावात सर्वच्या सर्व १० विकेट्स डावखुऱ्या गोलंदाजांनी घेण्याची ही दुसरी वेळ. याआधी भारतानं २००७ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध अशी कामगिरी केली होती. त्या सामन्यात मुरली कार्तिकनं ६, आरपी सिंग २, तर झहीर खान आणि इरफान पठाण यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली होती. आजच्या सामन्यात पाकिस्तानच्या शाहिन आफ्रिदीनं ५, वाहब रियाझनं ४ आणि इमाद वासीमनं १ विकेट घेतली.  

टॅग्स :पाकिस्तानझिम्बाब्वेभारत