Join us  

भारतात क्रिकेटची भलतीच 'क्रेझ', IPL फायनलचा सामना मध्यरात्री पण कोट्यवधी लोकांचं जागरण

ipl 2023 final : अखेरच्या चेंडूवर विजय मिळवत चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव केला अन् पाचव्यांदा आयपीएलचा किताब पटकावला.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2023 2:33 PM

Open in App

CSK vs GT Final : चेन्नई सुपर किंग्जने गतविजेत्यांना पराभूत करून आयपीएलवर पुन्हा एकदा आपले नाव कोरले. अखेरच्या चेंडूवर विजय मिळवत चेन्नईने गुजरात टायटन्सचा पराभव केला अन् पाचव्यांदा आयपीएलचा किताब पटकावला. लक्षणीय बाब म्हणजे आयपीएलच्या इतिहासाच प्रथमच एवढ्या उशिरा सामना खेळवला गेला. पावसाच्या व्यत्ययामुळे रविवारी होणारा सामना सोमवारी घेण्यात आला. पहिला डाव झाल्यानंतर सोमवारी देखील पावसाने बॅटिंग करण्यास सुरूवात केली आणि खेळाडूंना बाकावर बसावे लागले. 

पावसामुळे खेळपट्टी ओली झाली त्यामुळे खेळ खूप वेळ थांबवण्यात आला. अथक प्रयत्नांनंतर खेळपट्टी सुकी करण्यात बीसीसीआयच्या सपोर्ट स्टाफला यश आले. या सामन्यादरम्यान आयपीएल २०२३ चे अधिकृत डिजिटल स्ट्रीमिंग भागीदार Jio Cinema ने जागतिक डिजिटल व्ह्यूअरशिप मोठा विक्रम तोडला. खरं तर हा सामना रात्री उशिरा खेळवला गेला पण कोट्यवधी चाहत्यांनी जागरण करून अविस्मरनीय सामन्याचा आनंद लुटला.  

रात्रीस खेळ चाले... दरम्यान, सोमवारी झालेला आयपीएल २०२३ चा अंतिम सामना JioCinema वर एकाच वेळी ३.२ कोटी लोकांनी पाहिला. जगातील लाईव्ह स्ट्रीमिंग इव्हेंटच्या बाबतीत सर्वाधिक प्रेक्षकसंख्या म्हणून कालच्या सामन्याची नोंद झाली आहे. आयपीएल २०२३ च्या क्वालिफायर २ दरम्यान, गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील पहिल्या डावात शुबमन गिलच्या शतकाचा साक्षीदार होण्यासाठी विक्रमी २.५७ कोटी प्रेक्षकांनी Jio सिनेमावर हजेरी लावली. तसेच IPL चे माजी डिजिटल स्ट्रीमिंग भागीदार डिस्ने हॉटस्टारवर जुलै २०१९ मध्ये क्रिकेट सामन्यासाठी एकाच वेळी २.५ कोटीहून अधिक चाहत्यांना आपलंस केलं होतं. कित्येक वर्षे हा विक्रम कोणाला मोडता आला नाही पण काल आयपीएल २०२३ च्या सामन्याने हा विक्रम धुवून काढला. 

चेन्नईचा 'पाचवा' पराक्रमगुजरात टायटन्सला अखेरच्या चेंडूवर पराभूत धोनीच्या चेन्नईने पाचव्यांदा आयपीएलचा किताब उंचावला. अखेरच्या षटकांतील शेवटच्या २ चेंडूवर १० धावांची गरज असताना रवींद्र जडेजाने अनुभवाचे कौशल्य दाखवले. मोहित शर्माच्या पाचव्या चेंडूवर षटकार ठोकून त्यानं चाहत्यांना जागं केलं. तर, अखेरचा चेंडू जड्डूच्या पायाला लागून सीमीरेषेकडं गेला अन् चेन्नईच्या खेळाडूंसह चाहत्यांनी एकच जल्लोष केला.

 

   

टॅग्स :आयपीएल २०२३चेन्नई सुपर किंग्सगुजरात टायटन्समहेंद्रसिंग धोनीरवींद्र जडेजा
Open in App