लीड्स : इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान सुरु असलेल्या अॅशेस मालिकेत पुन्हा एकदा रोमांचक स्थिती निर्माण झाली आहे. दोन कसोटी गमावल्यानंतर इंग्लंडने तिसरा सामना जिंकला आहे. महत्वाचे म्हणजे ज्या प्लेअरवर कप्तान ब्रँडन मॅक्युलम याने अविश्वास दाखविलेला त्याच खेळाडून आज इंग्लंडला सामना जिंकवून दिला आहे.
मॅक्युलम याने जेव्हा मुख्य प्रशिक्षकपद सांभाळले तेव्हापासून म्हणजेच दीड वर्षापूर्वी ख्रिस वोक्स (Chris Woakes) जो टीम इलेव्हनचा नेहमी भाग असायचा त्याला काढून टाकले होते. मॅक्युलमने टीममध्ये खूप बदल केले होते. यामुळे वोक्सला टीममध्ये खेळण्याची संधी मिळत नव्हती. अॅशेस मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांमध्ये जेम्स अँडरसनच्या खराब कामगिरीनंतर मॅक्क्युलम आणि इंग्लंडनला ख्रिस वोक्सची आठवण आली. तब्बल 16 महिन्यांनंतर त्याला कसोटी खेळण्याची संधी मिळाली.
लीड्समध्ये खेळवण्यात आलेला सामना इंग्लंडने ३ विकेटने जिंकला. मार्क वुडला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला पण सामना जिंकण्यात ख्रिस वोक्सची भूमिका सर्वात महत्त्वाची होती. दुसऱ्या डावात इंग्लंडने 171 धावांवर 6 विकेट गमावल्या होत्या. विजयासाठी 251 धावांचे लक्ष्य गाठायचे होते. वोक्सने क्रीजवर येऊन जबाबदारीने फलंदाजी केली. हॅरी ब्रूकसोबत 49 धावांची भागीदारी रचली. ब्रूक बाद झाल्यानंतरही त्याने खेळणे सुरूच ठेवले आणि विजयी फटका मारून इंग्लंडला चार वर्षांनंतर अॅशेस विजय मिळवून दिला.
ख्रिस वोक्सने गोलंदाजीतही कमाल केली. त्याने 6 फलंदाज बाद केले आणि विशेष म्हणजे सर्व प्लेअर महत्त्वाचे होते. पहिल्या डावात त्याने मार्नस लबुशेन, ट्रॅव्हिस हेड आणि मिचेल मार्श यांना बाद केले. दुसऱ्या डावात उस्मान ख्वाजा, मिचेल मार्श आणि अॅलेक्स कॅरी यांची विकेट घेतली. मार्शने पहिल्या डावात शतक झळकावले होते. ऑस्ट्रेलिया मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत होता. पण वोक्सने मार्श आणि हेडची भागीदारी फोडली आणि तिथेच टर्निंग पॉईंट ठरला.