कोरोना व्हायरसच्या संकटात इंग्लंड-वेस्ट इंडिज मालिकेतून आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झाली. त्यामुळे आता हळुहळु क्रिकेटही पूर्वपदावर येऊ लागले आहे. आज दक्षिण आफ्रिकेत एका आगळ्यावेगळ्या सामन्याचं आयोजन केलं गेलं आहे. तीन संघ, एक सामना अशा या सामन्याची संकल्पना आहे आणि त्यात एबी डिव्हिलियर्स, क्विंटन डी'कॉक आदी तगडी फौज मैदानावर उतरणार आहे. Solidarity Cup असे या सामन्याला नाव देण्यात आले आहे आणि क्रिकेटमध्ये प्रथमच असा प्रयोग होत असल्यानं सर्वांना त्याची उत्सुकताही लागलेली आहे. ( 3TC Solidarity Cup South Africa)
यूएईत की महाराष्ट्रात? IPL 2020 चं भविष्य ठाकरे अन् मोदी सरकारच्या हातात!
या सामन्यात जवळपास सर्वच आफ्रिकन खेळाडूंनी सहभाग घेतला आहे. कागिसो रबाडा आणि ख्रिस मॉरिस यांना वैयक्तीक कारणास्तव या सामन्यातून माघार घ्यावी लागली आहे. ( Sad News : खेळाडूनं गमावला कुटुंबातील सदस्य; क्रिकेट सामन्यातून घेतली माघार! ). इगल, काईट्स आणि किंगफिशर अशा तीन संघांचे नेतृत्व अनुक्रमे एबी डिव्हिलियर्स, क्विंटन डी'कॉक आणि रिझा हेनड्रीक यांच्याकडे सोपवण्यात आले आहे.(3TC Solidarity Cup South Africa)
3T सामन्याचे नियम काय?
- Solidarity Cup असे या मॅचला नाव देण्यात आले आहे. प्रत्येक संघात 8 खेळाडूंचा समावेश असेल आणि 36 षटकांच्या सामन्यात प्रत्येक संघाला 12 षटकं खेळण्याची संधी दिली जाणार आहे.
- एक संघ उर्वरित दोन संघांविरुद्ध 6-6 षटकांच्या ब्रेकसह 12 षटके फलंदाजी करेल. संघातील सातवा गडी बाद झाल्यावर नाबाद फलंदाज फलंदाजी करू शकेल. पण, त्याची एकेरी धाव ग्राह्य धरली जाणार नाही. त्यामुळे त्याला केवळ दुहेरी धाव घ्यावी लागेल.
- प्रत्येक गोलंदाज जास्तीत जास्त तीन षटके टाकू शकतो. 12 षटकांत सर्वाधिक धावा करणारा संघ विजेता घोषित केला जाईल.
- विजेत्या खेळाडूला सुवर्णपदक, उपविजेत्या संघाला रौप्यपदक तर तिसऱ्या क्रमांकावरील संघाला कांस्यपदक दिले जाईल. सामना टाय झाल्यास सुपर ओव्हरमध्ये निकाल लावला जाईल.
- पण, जर पावसानं व्यत्येय आणल्यास षटकं कमी केली जातील.
- काईट्स - क्विंटन डी'कॉक ( कर्णधार), टेंम्बा बवूमा, जॉन-जॉन स्मट्स, डेव्हीड मिलर, ड्वेन प्रेटोरीअस, लुथो सिपाम्ला, बेऊरन हेनड्रीक्स, अॅनरिच नॉर्ट्जे
- किंगफिशर - रिझा हेनड्रीक्स ( कर्णधार), हेनरिच क्लासेन, जॅनेमन मलान, फॅफ ड्यू प्लेसिस, थंडो एनटिनी, गेराल्ड कोएत्झी, ग्लेंटोन स्टूर्मन, तरबेझ शॅम्सी.
- ईगल्स - एबी डिव्हिलियर्स ( कर्णधार), एडन मार्कराम, रॅसी व्हॅन डेर ड्युसेन, कायले व्हेरेयन्ने, अँडील फेहलुकवायो, बीजोर्न फॉर्टून, ज्युनियर डाला, लुंगी एनगिडी
- सामन्याची वेळ - दुपारी 2 वाजल्यापासून ( भारतीय वेळेप्रमाणे)
- थेट प्रक्षेपण - स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1एचडी, स्टार स्पोर्ट्स 2, स्टार स्पोर्ट्स 2एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी आणि स्टार सोर्ट्स 1 एचडी हिंदी, जिओ अॅप (3TC Solidarity Cup South Africa)