मुंबई : सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वात एक गोष्ट चांगलीच गाजत आहे. कसोटी क्रिकेटच्या एका सामन्यात विक्रम पाहायला मिळाला आहे. एकाच षटकात तब्बल चार चौकार आणि दोन षटकारांची अतिषबाजी पाहायला मिळाली. त्याचबरोबर एका षटकातील सर्वाधिक धावांच्या विक्रमाची बरोबरीही झाल्याचे पाहायला मिळाले.
ही गोष्ट घडली ती इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेच्या कसोटी सामन्यात. इंग्लंडचाजो रूट हा एक अव्वल दर्जाचा फलंदाज आहे. पण फलंदाजी करताना नाही तर गोलंदाजी करताना ही गोष्ट घडली आहे. आणि ही फटकेबाजी केली आहे ती एका गोलंदाजाने...
या कसोटी सामन्यातील ८२वे षटक रूट टाकत होता. यावेळी रूटच्या गोलंदाजीचा सामना आफ्रिकेचा तळाचा पलंदाज केशव महाराज करत होता. या षटकातील पहिल्या तिन्ही चेंडूंवर महाराजने चौकार लगावले. त्यानंतरच्या दोन चेंडूंवर त्याने चक्क दोन षटकार लगावले. त्यानंतरच्या चेंडूवर चार अतिरीक्त धावा निघाल्या आणि कसोटी क्रिकेटमधील एका षटकातील सर्वाधिक धावांची बरोबरी पाहायला मिळाली.
रूटने दुसऱ्या डावाच चार बळी मिळवले, पण दुसरीकडे त्याला एका षटकात २८ धावाही द्यावा लागल्या. यापूर्वी एका षटकात २९ धावा देण्याचा नकोसा विक्रम इंग्लंडचाच वेगवान गोलंदाज जेम्स अँडरसनच्या नावावर होता. त्याचबरोबर आफ्रिकेच्या रॉबिन पीटरसननेही एका षटकात २८ धावा दिल्या होत्या.