Legends League Cricket : ४, ६, ४, ४, ६ , ६ ; केव्हिन पीटरसननं एका षटकात चोपल्या ३० धावा, सनथ जयसूर्याची केली धुलाई, Video

केव्हिन पीटरसननं ३ चौकार व ३ षटकार खेचून Legends League Cricket स्पर्धेतील आतापर्यंतचे सर्वात महागड्या षटकाची नोंद केली

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2022 12:25 PM2022-01-27T12:25:50+5:302022-01-27T12:26:27+5:30

whatsapp join usJoin us
4 6 4 4 6 6, Most expensive over of Legends League Cricket, Kevin Pietersen smashes Sanath Jayasuriya for 30 runs in an over  | Legends League Cricket : ४, ६, ४, ४, ६ , ६ ; केव्हिन पीटरसननं एका षटकात चोपल्या ३० धावा, सनथ जयसूर्याची केली धुलाई, Video

Legends League Cricket : ४, ६, ४, ४, ६ , ६ ; केव्हिन पीटरसननं एका षटकात चोपल्या ३० धावा, सनथ जयसूर्याची केली धुलाई, Video

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Legends League Cricket : इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन ( Kevin Pietersen) यानं Legends League Cricket स्पर्धेत श्रीलंकेचा माजी अष्टपैलू खेळाडू सनथ जयसूर्य ( Sanath Jayasuriya) याच्या एका षटकात ३० धावा कुटल्या. पीटरसननं ३ चौकार व ३ षटकार खेचून Legends League Cricket स्पर्धेतील आतापर्यंतचे सर्वात महागड्या षटकाची नोंद केली. त्यानं ३८ चेंडूंत ७ षटकार व ९ चौकारांसह ८६ धावा करताना वर्ल्ड जायंट्स संघाला ७ विकेट्स राखून आशियाई लायन्सवर विजय मिळवून दिला.  
जयसूर्यानं या समन्यात एकच षटक टाकले आणि तेही महाग ठरले. आयर्लंडच्या केव्हिन ओ'ब्रायननं २४ चेंडूंत नाबाद ३१ धावा केल्या. त्यात १ षटकार व ३ चौकारांचा समावेश होता. 



नाणेफेक जिंकल्यानंतर वर्ल्ड जायंट्सचा कर्णधार डॅरेन सॅमी यानं प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि आशियाई लायन्सना १४९ धावांवर रोखले. जयसूर्या व तिलकरत्ने दिलशान यांना चांगली सुरुवात करून देता आली नाही. जयसूर्या ३, तर दिलशान १७ धावांवर माघारी परतला. पुन्हा एकदा असघर अफघान संघासाठी धावला. त्यानं २६ चेंडूंत ४ चौकार व १ षटकार खेचून ४१ धावा केल्या. रोमेश कालुवितरणानं २६ धावा केल्या.  

संक्षिप्त धावफलक - आशियाई लायन्स ७ बाद १४९ धावा ( असघर अफघान  ४१, रोमेश कालुवितरणा २६; मॉर्ने मॉर्केल २-२४, रायन साईडबॉटम २-३८) पराभूत वि. वर्ल्ड जायंट्स १३ षटकांत ३ बाद १५२ ( केव्हिन पीटरसन ८६, केव्हिन ओ'ब्रायन नाबाद  ३१) 

Web Title: 4 6 4 4 6 6, Most expensive over of Legends League Cricket, Kevin Pietersen smashes Sanath Jayasuriya for 30 runs in an over 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.