Legends League Cricket : इंग्लंडचा माजी कर्णधार केव्हिन पीटरसन ( Kevin Pietersen) यानं Legends League Cricket स्पर्धेत श्रीलंकेचा माजी अष्टपैलू खेळाडू सनथ जयसूर्य ( Sanath Jayasuriya) याच्या एका षटकात ३० धावा कुटल्या. पीटरसननं ३ चौकार व ३ षटकार खेचून Legends League Cricket स्पर्धेतील आतापर्यंतचे सर्वात महागड्या षटकाची नोंद केली. त्यानं ३८ चेंडूंत ७ षटकार व ९ चौकारांसह ८६ धावा करताना वर्ल्ड जायंट्स संघाला ७ विकेट्स राखून आशियाई लायन्सवर विजय मिळवून दिला. जयसूर्यानं या समन्यात एकच षटक टाकले आणि तेही महाग ठरले. आयर्लंडच्या केव्हिन ओ'ब्रायननं २४ चेंडूंत नाबाद ३१ धावा केल्या. त्यात १ षटकार व ३ चौकारांचा समावेश होता.
संक्षिप्त धावफलक - आशियाई लायन्स ७ बाद १४९ धावा ( असघर अफघान ४१, रोमेश कालुवितरणा २६; मॉर्ने मॉर्केल २-२४, रायन साईडबॉटम २-३८) पराभूत वि. वर्ल्ड जायंट्स १३ षटकांत ३ बाद १५२ ( केव्हिन पीटरसन ८६, केव्हिन ओ'ब्रायन नाबाद ३१)